kolhapur collector daulat desai tile terms and conditions for lock down 4.0
kolhapur collector daulat desai tile terms and conditions for lock down 4.0 
कोल्हापूर

३१ मे पर्यंत वाढला लॉकडाऊन; कोल्हापुरात 'हे' राहणार सुरू, 'हे' राहणार बंद

सुनील पाटील

कोल्हापूर : राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे आज कोल्हापूर जिल्ह्यातील लॉकडाऊनही 31 मे पर्यंत वाढविण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिली. दरम्यान, या लॉकडाऊनमध्ये शहरी व ग्रामीण भागातील सर्व लहान-मोठे उद्योग-व्यवसाय, सर्व कृषी साहित्य खरेदी-विक्री, माल व मालवाहतूक, मद्यविक्री दुकाने, शहर-ग्रामीणमधील बांधकाम, उद्योग, व्यापार, व्यवसाय पूर्वीप्रमाणे सुरू ठेवले जातील. तर जिल्ह्यांच्या कर्नाटक, सांगली, सातारा, सिंधुदूर्गसह इतर सीमा, शाळा- महाविद्यालये, चित्रपटगृहे, शैक्षणिक संस्था, मंदिर, मशीद तसेच प्रार्थनास्थळे बंद ठेवली जाणार आहेत. 


याबाबत माहिती देताना देसाई म्हणाले, कोल्हापूरमध्ये परजिल्ह्यातून येणाऱ्या लोकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येत आहे. त्यामुळे कोरोनाचा आकडा वाढत आहे. यापार्श्‍वभूमीवर काळजी घेण्यासाठी म्हणून राज्य शासनाने दिलेल्या सूचनेप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील लॉकडाऊनही वाढवले जात आहे. दरम्यान, पान टपरी, ऑटो रिक्षा, सहाआसनी रिक्षा पुढील आदेश निघेपर्यंत बंद ठेवले जातील.

ग्रीन, ऑरेंज आणि रेड असे तीन झोन जाहीर केले आहेत. यात कोल्हापूर जिल्हा ऑरेंज झोनमध्ये आहे. 

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


हे बंद राहणार 

-जिल्ह्याच्या सर्व सीमा

-जीवनावश्‍यक सेवा वगळता इतर मालवाहतूक

- सेवा, सुविधा व वाहतूक, परवाने दिलेले वगळता दोन जिल्ह्यांतील व्यक्ती, वाहनांची वाहतूक 
- ऑटो रिक्षा, सहाआसनी रिक्षा, टॅक्‍सी, चारचाकी वाहनांतून चालक व दोन प्रवाशांपेक्षा जास्त व्यक्तींची वाहतूक 
- स्पा, मसाज सेंटर, खाऊची पाने, गुटखा, तंबाखू, सुपारी दुकाने बंद 
- सार्वजनिक ठिकाणी पान, गुटखा, तंबाखू, सुपारी खाणे व थुंकणे 
- सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक, प्रशिक्षण देणाऱ्या संस्था 
- सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्री, चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल्स, शॉपिंग मार्केट 
- व्यायामशाळा, क्रीडा संकुले, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, बार 

सशर्त सुरू राहणारी सेवा
शहरी ग्रामीण भागातील उद्योग, औद्योगिक कारखाने 
- कृषी व फलोत्पादन अंतर्गत येणारे उपक्रम 
- शेतकरी व शेतमजूर, शेतीविषयक विविध कामे 
- कृषीविषयक वस्तू, खरेदी-विक्री करणाऱ्या संस्था 
- दूध आणि दुग्धजन्य पदार्थ गोळा करणे, प्रक्रिया करणे, वितरण व विक्री करणे 
- प्रसारमाध्यमासह इलेक्‍ट्रॉनिक मीडिया ज्यात डीटीएच आणि केबल सेवा 
- शहरी आणि ग्रामीणमधील भागात सर्व प्रकारची बांधकामे 
- अत्यावश्‍यक नसणाऱ्या कारणांसाठी नागरिकांची आणि अत्यावश्‍यक व जीवनावश्‍यक वैद्यकीय सेवेव्यतिरिक्त इतर वाहनांची जिल्हांतर्गत हालचाल सायंकाळी सात ते सकाळी सात या कालावधीत प्रतिबंधीत 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Virat Kohli : 'तुमच्यापेक्षा माझा खेळ मी अधिक जाणतो म्हणूनच....' विराट कोहलीने टीकाकारांना दिले उत्तर

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

SCROLL FOR NEXT