Kolhapur district anti education resolution will be passed in Gram Sabha on Independence Day 
कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनी ग्रामसभांत करणार शिक्षणविरोधी ठराव

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - केंद्र सरकारने हुकूमशाही पद्धतीने संविधान व फुले-शाहू-आंबेडकर विचारविरोधी नवे शैक्षणिक धोरण जनतेवर लागले आहे. त्याविरोधात कोल्हापुरातील विविध संघटना एकवटल्या असून १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या ग्रामसभांत एकमताने नवीन शिक्षणविरोधी ठराव करण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. तसा निर्धार लक्ष्मीपुरीतील श्रमिक हॉलमध्ये झालेल्या बैठकीत झाला. आंदोलनाची व्यापकता वाढवण्यासाठी तालुक्‍यांमध्ये व्यापक बैठक आयोजिण्याचे ठरले.

माजी शिक्षण संचालक महावीर माने म्हणाले, ‘‘संविधान पुरस्कृत वैज्ञानिक दृष्टिकोन व फुले शाहू आंबेडकरांचा विचार अभ्यासक्रमात येणे, अपेक्षित आहे. हे सरकार धार्मिक व राजकीय अजेंडा रेटणारा अभ्यासक्रम लादण्याच्या तयारीत आहे.’’

गिरीश फोंडे म्हणाले, ‘‘सरकारचे नवे शैक्षणिक धोरण म्हणजे मनुवाद व मनी वादाचे षडयंत्र आहे. गोरगरिबांचे शिक्षण बंद करून त्यांना वेठबिगारीसाठी तयार केले जाईल.’’
अतुल दिघे यांनी जागतिकीकरणाचे भांडवलशाही धोरण लादण्यासाठी व शिक्षण ही बाजार वस्तू करण्यासाठीच नवीन शैक्षणिक धोरण आणले आहे. मामा भोसले यांनी खेड्यापाड्यात मुलांचे शिक्षण महाग होणार असल्याचे स्पष्ट केले. व्यंकाप्पा भोसले यांनी बीजेपी सरकारला वंचितांना गुलाम ठेवण्यासाठी त्यांचे शिक्षण हिरावून घेत असल्याचे सांगितले. डॉ. सुभाष जाधव, प्रसाद पाटील, सुधाकर सावंत, राजेश वरक, सुवर्णा तळेकर, बाबूराव कदम, वसंत पाटील, व्ही. जी. पाटील, उत्तम पाटील, उमेश देसाई, प्रशांत आंबी, नवनाथ मोरे, गजानन काटकर यांनी मनोगत व्यक्त केले.संजय कुर्डूकर, संजय पाटील, हरीश कांबळे, उत्तम कुंभार, गौतम वर्धन, प्रकाश पाटील, एच. जी. सुतार, सुनील कोळी, विनोद भोंग उपस्थित होते.

पुस्तिका प्रकाशित करणार

कार्यकर्त्यांना शैक्षणिक धोरण समजून सांगण्यासाठी एकदिवसीय ऑनलाइन शिबिर घेतले जाणार आहे. माहिती पत्रक काढून हजारोंच्या संख्येने ते जनतेपर्यंत पोचवली जाईल. धोरणाची पोलखोल करणारी पुस्तिका प्रकाशित केली जाणार आहे. सोशल मीडियाचा वापर करत विविध कृती कार्यक्रम जनतेपर्यंत पोचवण्याचा निर्णय झाला. तसेच त्याचबरोबर सह्यांची मोहीम देखील घेण्याचे ठरले.

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dr. Neelam Gorhe : शिवसेना २५ जागांवर ठाम; वरिष्ठ स्तरावरून निर्णय होणार

Cold And Flu Myth: ओल्या केसांनी थंडीत बाहेर गेल्यास सर्दी होते का? वाचा डॉक्टरांचे मत

Pune Municipal Election : ‘मविआ’चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला; तिन्ही पक्षांना प्रत्येकी ५० जागा

Asif Ali Zardari: ‘आम्हाला बंकरमध्ये लपावं लागलं...’ ऑपरेशन सिंदूरबाबत पाकिस्तानच्या अध्यक्षांची कबुली; काय म्हणाले?

Pune Municipal Election : मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेला हव्यात प्रत्येकी ३५ जागा

SCROLL FOR NEXT