Kolhapur-Flood 
कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा धोका पातळीकडे ; नागरिकांचे स्थलांतर सुरू

सुनील पाटील

कोल्हापूर : राजाराम बंधारा (Rajaram Dam)येथे पंचगंगा नदीची पाणीपातळी 39'6" फूट झाली आहे. जिल्ह्यातील 105 बंधारे पाण्याखालील गेले आहेत. त्यामुळे पंचगंगा नदी (Panchganang River) आता इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे जात आहे. जिल्ह्यात कालपासून अतिवृष्टी सुरू आहे या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे दुपारी चार वाजता पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे जात आहे त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर सुरू केले आहे. तसेच जिल्ह्यामध्ये सतर्कतेचा इशारा ही जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. काल रात्रीपासून बऱ्याच नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. नदीकाठचे नागरिक, पुरामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांबरोबरच सर्वांनी प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करून सहकार्य करावे, जेणेकरून वेळेत मदत उपलब्ध करुन देवून जिवीत व वित्तहानी टाळता येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

जिल्ह्यात पावसाच्या पाण्यामुळे बंद करण्यात आलेले रस्ते नागरिकांनी ओलांडू नयेत. तसेच या ठिकाणी लावण्यात आलेले बॅरीगेट्स काढण्याचा प्रयत्न करून स्वत:चा व कुटूंबियांचा जीव धोक्यात घालू नये. पूर परिस्थितीत मदत कार्यासाठी एनडीआरएफची दोन पथके जिल्ह्यात दाखल झाली असून एक पथक शिरोळ तालुक्यात तर दुसरे पथक करवीर येथे दाखल झाले आहे.

गर्भवती महिला, कोरोनाचे रूग्ण, प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिक तसेच गंभीर आजाराच्या रूग्णांना वेळेत उपचार मिळवून देण्यासाठी आरोग्य विभागाने तयारी केली आहे. प्रशासन, आरोग्य विभाग तसेच गावातील आपत्ती व्यवस्थापन समितीने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून नागरिकांनी सहकार्य करावे.

पूरपरिस्थितीत नागरिकांच्या स्थलांतरासाठी प्रशासनाच्यावतीने सुरक्षित ठिकाणी निवाऱ्याची आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासनाने विस्थापित होण्याची सूचना केल्यास तात्काळ स्थलांतरीत होवून प्रशासनाला सहकार्य करावे. नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होताना आवश्यक ती महत्वाची कागदपत्रे, आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड, मौल्यवान वस्तू, औषधे, स्वत:चे साहित्य जसे साबण, ब्रश, पेस्ट, मोबाईल चार्जर, आवश्यक तेवढे कपडे, दोरी आदी साहित्य सोबत घ्यावे. घर सोडताना घरातील अवजड, किंमती साहित्य जसे सोफा, टिव्ही कपाटे इ. घरातील सर्वात उंच ठिकाणी ठेवावे. घरातील लाईटचा मेन स्विच, गॅस सिलेंडर बंद करावेत, असेही आवाहन जिल्हाधिकारी रेखावार यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PCMC Election: विकास फक्त शरद पवारांनीच केला, समोरासमोर चर्चेला अजितदादांचं थेट आव्हान! भाजपवर तुफान हल्लाबोल

LIC Loss : जीवन सुरक्षा देणाऱ्या LIC ची सिगारेट कंपनीत गुंतवणूक; पण बसला ११,००० कोटींचा फटका

Latest Marathi News Live Update : आम्ही आरोप केले तर अडचण होईल, भाजपचा अजितदादांना इशारा

टीकाकारांना मी त्यांच्याच... सचिन पिळगावकरांचा ट्रोलर्सवर पलटवार; चार वाक्यात विषय संपवला

Chandrapur crime News : चंद्रपूर किडनी प्रकरणातल्या आरोपीनं पोलिसांना गंडवलं, कसा दिला गुंगारा?

SCROLL FOR NEXT