Kolhapur District Secondary Teacher Patsanthis organized a golden event kolhapur Marathi news 
कोल्हापूर

‘थाळी फेक थांबली नव्हं .....?

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाकरिता कोल्हापूर जिल्ह्यातून एक उमेदवार देण्यासाठी एकत्र या, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज येथे केले. 
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सभासदांना सुवर्णमहोत्सवी भेट वाटप, पूरग्रस्त शाळांना मदत व ‘कोजिमाशि’ दिनदर्शिकेचे प्रकाशन झाले. शाहू मार्केट यार्डातील शाहू सांस्कृतिक भवनमध्ये कार्यक्रम झाला. 

मंत्री पाटील म्हणाले, ‘नवीन शैक्षणिक धोरण २०१५ला आणले गेले. त्याच्या अहवालावर देशातील लोकांनी सूचना केल्या. दोन लाख सूचना पाठविल्या गेल्या असतानाही त्याचे पुढे काय झाले, हे माहीत नाही. शिक्षक वर्गाने अशा विषयांत खरबदारी घेतली पाहिजे. नवा राष्ट्रीय शिक्षण आयोग पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली असणार आहे. त्यातून शैक्षणिक धोरणात राज्याचे हक्क कमी होणार का, असा प्रश्‍न निर्माण होत आहे. येत्या आठ दिवसांत आयोगाचा मसुदा मंजुरीसाठी कॅबिनेटसमोर येण्याची शक्‍यता आहे. आयोगातील अभ्यासक्रमाच्या रचनेवर लक्ष देणे आवश्‍यक आहे. कारण त्यात इतिहास पुसण्याचे काम केले जाऊ शकते.’’ 

मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याचे आव्हान
त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याचा शिक्षक आमदार होण्यासाठी सर्वांनी एकसंघ राहण्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही सांगितले. 
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘‘कोजिमाशि व केडीसीसीचे ऋणानुबंध आहेत. पतसंस्थेच्या ठेवी केडीसीसीकडे असून, पतसंस्था काटकसरीने काम करत आहे. ही जमेची बाजू असली तरी शाळांतील कमी होणारी पटसंख्या चिंताजनक आहे. अतिरिक्त शिक्षकांचे प्रश्‍न वाढत आहेत. मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याचे आव्हान शिक्षकांसमोर आहे. या परिस्थितीत अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आली आहे.’’ असे सांगून कोजिमाशिचे शिक्षण क्षेत्रातील काम आदर्शवत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

शिक्षक मतदारसंघासाठी एकत्र या
तज्ज्ञ संचालक डी. जी. लाड यांनी पतसंस्थेच्या पन्नास वर्षांतील वाटचालीचा आढावा घेतला. त्यांनी कोजिमाशि पतसंस्थेने ३८३ कोटींच्या ठेवीचा आकडा पार केला असून, सभासद हिताच्या योजना अमलात आणल्याचे सांगितले. 
या प्रसंगी आमदार चंद्रकांत जाधव, शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे, शिक्षणाधिकारी किरण लोहार, शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड, कोजिमाशि पतसंस्थेचे संचालक बाळ डेळेकर, सदाशिव देसाई, कृष्णात पाटील, रावसाहेब कारंडे, संजय डवर, हिंदूराव पाटील, अनिल चव्हाण, शांताराम तौंदकर, राजेंद्र रानमाळे, कृष्णात खाडे, गंगाराम हजारे, आनंद काटकर, अरविंद किल्लेदार, पुंडलिक जाधव, भरत रसाळे, अशोक जाधव उपस्थित होते. पतसंस्थेचे अध्यक्ष कैलास सुतार यांनी प्रास्ताविक केले. संदीप मगदूम यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष सुभाष पाटील यांनी आभार मानले.

 
शिक्षण क्षेत्रातील प्रश्‍नांचा घेतला वेध
श्री. मुश्रीफ यांनी भाषणाच्या सुरवातीलाच ‘थाळी फेक थांबली नव्हं?’ असा प्रश्‍न उपस्थित केला. त्यावर सभागृहात हशा पिकला. त्यानंतर मुश्रीफ यांनी शिक्षण क्षेत्रातील प्रश्‍नांचा नेमकेपणाने वेध घेत शिक्षक वर्गाला आत्मचिंतन करण्याची वेळ आल्याचे स्पष्ट केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

Navi Mumbai : APMC मार्केटजवळ भीषण आग, १० पेक्षा जास्त ट्रक, टेम्पो जळून खाक

Bus-Car Accident : कोल्हापुरातून महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; बस-कारच्या धडकेत चौघे ठार, एक जण जखमी

Panchang 7 July 2025: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा किमान 108 जप करावा

SCROLL FOR NEXT