Digital loan Sakal
कोल्हापूर

Kolhapur : ‘ईझी कर्ज’ ‘ईझी बदनामी’ ; ब्लॅकमेलिंग सुरू होते

सतर्कता हवी; मोबाईलवर आलेली लिंक क्लिक करणे पडेल महागात

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : मोबाईलवर लिंक आली आणि तातडीने कर्ज मिळणार म्हणून क्लिक केले तर, पैसे मिळतात. पण त्यातून पुढे ब्लॅकमेलिंग सुरू होते. बदनामीची भीती दाखविली जाते आणि तोंडाला येईल तितक्या पैशांची मागणी होते. एकदा, दोनदा पैसे दिले तरीही मागणी पुढे वाढतच जाते. त्यामुळे ‘सावधान राहा, सतर्क राहा...’ ऑनलाईन ईझी कर्ज घ्याल, तर पैसे जातीलच ईझी बदनामीही होईल. हे लक्षात ठेवा.

नुकताच कोल्हापुरात घडलेले हे एक उदाहरण आहे. तो परगावी होता. त्याला तातडीने तीन-चार हजारांची गरज होती. दुर्दैवाने त्याचवेळी त्याच्या मोबाईलवर ऑनलाईन कर्ज उपलब्ध असल्याचा मेसेज आला. त्याने क्लिक केला. त्याला पाच हजारांच्या कर्जाच्या बदल्यात तीन हजार रुपये मिळाले. पाच हप्ते होते.

मात्र, दोनच दिवसांत त्याला वेगवेगळ्या क्रमांकावरून कॉल येऊ लागले. जादा पैशाची मागणी होऊ लागली. पैसे न दिल्यास बदनामी करण्याची धमकी दिली जाऊ लागली. पुढे त्याला क्षणक्षणाला बदनामीची भीती वाटू लागली. थोड्याच वेळात मिक्सिंग केलेली अश्‍लील छायाचित्रे त्‍याच्या मोबाईलवर पाठविले जाऊ लागले.

त्याच्या मोबाईल हॅण्डसेटमधील सर्व डेटा हॅक झाला होता. त्यामुळे कॉन्टॅक्ट लिस्टमधील कोणालाही कॉल करून तुमच्याकडून पैसे घेण्यास सांगितले आहेत, असे सांगून पैशाची मागणी केली जाऊ लागली. मग कॉन्टॅक्ट लिस्टमधील संबंधितांचे कॉल ऑनलाईन कर्ज घेतलेल्या त्या व्यक्तीला येऊ लागले. त्यामुळे त्याची बदनामी वाढत चालल्याचे त्याला लक्षात आले. त्याने तातडीने सोशल मीडियावर मोबाईल हॅक झाल्याचा ‘स्टेटस’ ठेवला.

मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तो हैराण झाला. पाच हजाराला दहा हजार जाऊ देत; पण हा मनस्ताप थांबू दे, अशी त्याची मानसिकता झाली. त्याने थेट पोलिस मुख्यालयातील सायबर सेलमध्ये धाव घेतली. तेथे पोलिसांनी त्याला सहकार्य केले आणि त्यातून त्याची सुटका झाली. हे विकतचे दुखणे टाळायचे असेल, तर आपल्याला सतर्कता बाळगण्याची नितांत गरज आहे.

चुकून पैसे ट्रान्स्फर झाल्यास बँकेशी संपर्क साधा

तुमच्या अकाऊंटवर चुकून पैसे ट्रान्स्फर झाले आहेत. ते परत करा असाही मेसेज आला तरीही त्याला ते पैसे परत करू नका. बँकेशी संपर्क करूनच कार्यवाही करा. कारण यातून तुमच्या मोबाइल हॅण्डसेटमधील सर्व डेटा हॅकरकडे जाऊ शकतो. त्यातून तुमची फसवणूक होऊ शकतो. तसेच ‘ओटीपी’ किंवा ‘पासवर्ड’ सुद्धा कोणालाही देऊ नका. अशी फसवणूक झाल्यास तातडीने सायबर पोलिसांशी संपर्क साधा. गतवर्षी रजिस्टर फिर्यादीनुसार लाखो रुपये ग्राहकांना परत केले आहेत.

कितीही गरज असली तरीही मोबाईलवर येणाऱ्या लिंकवरून कोणतेही कर्ज घेऊ नका, किंबहुना अमिषाला बळी पडू नका. ऑनलाईन कर्जातून केवळ मनस्ताप नव्हे, तर मोठी बदनामी ही केली जाते. मोबाइल हॅक करणाऱ्यापर्यंत पोचण्याचा पोलिस प्रयत्न करीत असतात. मात्र दरम्यानच्या काळात मोठी बदनामी होते. त्यामुळे कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, काही चूक झाली असल्यास थेट पोलिस अधीक्षक कार्यालयातील सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क साधा.

- संजय गोर्ले, पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Assembly Election 2025: बिहार निवडणुकीच्या तारखांची घोषणा करत, ‘ECI’ने मतदारांनाही केल्या १० महत्त्वाच्या सूचना!

साडी नेसलेला सचिन जोरात ओरडला आणि रिक्षावाला घाबरला... निवेदिता यांनी सांगितला 'बनवाबनवी'च्या शूटिंगचा किस्सा

Latest Marathi News Live Update : ६ आणि ११ नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात बिहार निवडणूका

Chakan Nagarparishad Election : कही खुशी, कही गम ! चाकण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिलेचे आरक्षण

Manchar Nagarpanchyat Election : नगराध्यक्षपदाचे स्वप्न पाहणाऱ्या कार्यकर्त्यांचा हिरमोड; मंचर नगरपंचायत नगराध्यक्षपद ओ.बी.सी. महिलेसाठी राखीव

SCROLL FOR NEXT