kolhapur engineer dead in japan 
कोल्हापूर

जपान, मृत्यू अन... प्रतीक्षा; हृदय हेलावणारी घटना

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : नेव्हीत चीफ इंजिनियर असलेल्या शरद पातकर यांचा जपानमध्ये मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह कोल्हापुरात आणण्यासाठी मुलगा अभिषेक राजदूतांशी संपर्कात असून, आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात गुंतला आहे. त्याची आई ममता या अश्रूंना वाट मोकळी करून देत आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावाने विमान बंद असल्याने मृतदेहाच्या प्रतीक्षेत पातकर कुटुंबीयांचा प्रत्येक दिवस ढळतो आहे. मनमिळावू व मैत्रीला जागणाऱ्या पातकर यांच्या मृत्यूने शाहूपुरी परिसरही हळहळला आहे. 

जपानमधील शूनान प्रांतात सेवेत असताना श्री. पातकर यांच्या छातीत 19 मे रोजी दुखायला लागले. शेकूयामा सेंट्रल हॉस्पिटलमध्ये त्यांना तत्काळ दाखल केले. त्यांच्या 21 व 27 मेस अँजिओप्लास्टीच्या दोन शस्त्रक्रिया झाल्या. त्यातूनही ते वाचले नाहीत. त्यांची दोन जूनला दुपारी तीन वाजता प्राणज्योत मालवली. त्याची माहिती त्याच दिवशी त्यांच्या कोल्हापुरातील कुटुंबियांना कळविण्यात आली. पत्नी ममता, मुलगा अभिषेक, भाऊ सतीश, वहिनी मंगल पातकर, सासरे सदाशिव कोठावळे, यांना त्यांच्या मृत्युने धक्‍का बसला. अश्रूंना वाट मोकळी करत ते त्यांच्या मृतदेहाचे दर्शन घेण्याच्या प्रतीक्षेत आहेत. श्री. पातकर यांचा मृतदेह आणण्यासाठी कुटुंबिय भारतीय राजदूतांशी संपर्क साधून आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता करत आहेत. 

श्री. पातकर मूळचे कोल्हापुरातील. जुन्या शाहूपुरी पोलिस ठाण्यामागील परिसरात त्यांचे वास्तव्य. विद्यापीठ हायस्कूलचे ते माजी विद्यार्थी. राजाराम महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षणाचा पाठ गिरवल्यानंतर कऱ्हाडमधील कऱ्हाड कॉलेजमधून त्यांनी बी. ई. मेकॅनिकलची पदवी मिळवली. मुंबईतल्या लालबहाद्दूर शास्त्री मरीन इन्स्टिट्यूटमधून दोन वर्षांचा मरीन इंजिनियरींगचा अभ्यासक्रम पूर्ण केला. नेव्हीसाठी झालेल्या परीक्षेत ते पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाले. श्री. पातकर शरीरसौष्ठवपटू होते. त्यांनी "कऱ्हाड श्री' किताब पटकावला होता. त्यांना व्हॉलीबॉलचीही विशेष आवड होती. 

वडिलांचा मृतदेह जपानमधील टोकियो शहरातील शवागारात ठेवला आहे. राजदूतांशी आमचा संपर्क सुरू आहे. कागदपत्रांची पूर्तता केली आहे. 
- अभिषेक पातकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT