Farmers esakal
कोल्हापूर

कोल्हापूर : रब्बी तोंडावर, मदत लांबणीवर शेतकरी प्रतिक्षेत

पीक नुकसानीच्या भरपाईचा प्रश्‍न; शेतकरी प्रतिक्षेत, महापुराचा उसाला सर्वाधिक फटका

अजित माद्याळे : सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज: खरीपातील सोयाबीन पिकाची काढणी पन्नास टक्क्याहून अधिक झाली आहे. येत्या पंधरावड्यात भातही कापणीला येईल. खरीपाला निरोप देत शेतकऱ्यांनी हळूहळू रब्बीची तयारी सुरु केली आहे. रब्बी तोंडावर आले असतानाही जुलै महिन्यातील अतिवृष्टी व महापुरात झालेल्या खरीप पिकांची नुकसान भरपाई लांबणीवर पडत चालली आहे. रब्बी हंगाम जसा जवळ येईल, तसे शेतकऱ्यांची पैशाची गरज वाढत असून ते आता महापुरातील पिक नुकसानीच्या मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.

अलीकडे काही वर्षापासून अतिवृष्टी आणि महापूर ठरलेले आहे. यंदाही अतिवृष्टी व महापुराने शेतकऱ्यांचा घास हिरावून नेला. ऊस, भात, भुईमूग, सोयाबीन आदी पिकांना मोठा फटका बसला. गडहिंग्लज तालुक्यात हिरण्यकेशी, घटप्रभा या नद्यांसह काही ओढ्यावरील १३७० हेक्टरमधील ऊस महापुराच्या भक्ष्यस्थानी पडला. एकूण नुकसानीच्या क्षेत्रातील ६७ टक्के नुकसान उसाचे झाले आहे. अधिक दिवस पाणी पिकात तुंबल्याने उसाचे उत्पादन निम्म्याहून अधिक घटण्याची भिती आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांचे कारण देत शासन यंत्रणेकडून पंचनामे कासव गतीने पूर्ण झाले.

मात्र मदतीची प्रतिक्षा अजून संपलेली नाही. आता रब्बी हंगाम तोंडावर आला आहे. रब्बीच्या पेरणीसाठीही शेतकऱ्यांच्या हातात पैसा लागतो. खरीपातील पिकांपासून मिळेल ते उत्पादन हातात घेवून शेतकरी रब्बीसाठी सज्ज झाला आहे. खरीपात मिळालेल्या उत्पन्नातील काही हिस्सा शेतकरी रब्बीसाठी खर्च करत असतो. परंतु अतिवृष्टी, महापुराने झालेले नुकसान मिळालेल्या खरीप उत्पन्नातून भरून निघालेले नाही. यामुळे रब्बीसाठी त्यांना पैशाची गरज आहे. शासनाची मदत मिळेल या अपेक्षेने शेतकरी दिवस काढत आहे. मात्र अजूनही मदतीचा पत्ता नाही. मदत येईपर्यंत शेतकरी वाट पाहणार नाही, पण शेतकऱ्यांच्या डोईवर पुन्हा रब्बीच्या खर्चाचा भार येणार आहे, एवढे मात्र निश्‍चित.

पिकनिहाय नुकसान (क्षेत्र हेक्टरमध्ये)

- ऊस : १३७०.७५

- भाजीपाला : ११.४९

- भात : ३४०.५३

- भुईमूग : ३७.७७

- सोयाबीन : २६४.२५

- इतर पिके : १.७६

- नुकसानीचे एकूण क्षेत्र : २०२५.५५

- एकूण खातेदार शेतकरी : १०६०३

- अपेक्षित निधी : ३ कोटी २२ लाख

"अतिवृष्टी व महापुरातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करुन मदतीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे. अजून मदत प्राप्त झालेली नाही."- हरिदास बोंगे, प्र. तालुका कृषी अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CCMP BHMS Registration : सीसीएमपी-बीएचएमएस नोंदणीला राज्य सरकारचा हिरवा कंदील; आयएमएकडून राज्यव्यापी सेवा बंदची घोषणा

PMC Development : स्वच्छतागृहे दुरुस्तीऐवजी पाडण्यावर नगरसेवकांचा भर; ५५ प्रस्ताव नव्या बांधकामासाठी

Crime News : माहूरवरून परतणाऱ्या नवविवाहितांवर थरारक हल्ला; नववधूसह दोन लाखांची रोकड लंपास

Karad News : मतदारयादी सखोल पुनरिक्षणात कऱ्हाड दक्षिणची बाजी; पुणे विभागात प्रथम

पेट्रोल-डिझेल आणखी महागणार? केंद्र सरकारने विंडफॉल कराच्या दरात केली मोठी वाढ

SCROLL FOR NEXT