Kolhapur Flood esakal
कोल्हापूर

Kolhapur Flood : पावसाचा जोर कमी असला, तरी महापुराची स्थिती गंभीरच! पंचगंगेची पाणीपातळी किती फुटांवर?

पावसाने जिल्ह्यात ४५३ कच्च्या व पक्क्या घरांची व ५२ जनावरांच्या गोठ्यांची पडझड झाली.

सकाळ डिजिटल टीम

महापुरामुळे जिल्ह्यातील १५ हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली आहे. यामध्ये नऊ हजार हेक्टर ऊस पीक आहे. भात, सोयाबीन, भुईमूग यासह अन्य पिकांचे क्षेत्र सहा हजार हेक्टर आहे.

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात (Kolhapur Flood) काल दिवसभरात पावसाचा जोर कमी होऊन उघडझाप सुरू राहिली. राधानगरी धरणाचे क्रमांक चार व क्रमांक पाच स्वयंचलित दरवाजे सायंकाळपर्यंत बंद झाल्याने विसर्ग निम्म्याने घटला आहे. त्यामुळे महापुरात किंचितसा दिलासा मिळाला. सध्या दोन दरवाजांमधून ४३५६ क्युसेक विसर्ग सुरू आहे.

दुसरीकडे पंचगंगेच्या (Panchganga River) पाणी पातळीत इंचा-इंचाने वाढ होत होती. जिल्ह्यातील अन्य नद्याही दुथड्या भरून वाहात आहेत. त्यामुळे पावसाचा जोर कमी असला तरी महापुराची स्थिती गंभीरच आहे. दिवसभरात जिल्ह्यात २५१३ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. शहरातील रमणमळा, सिद्धार्थनगर, कदमवाडी, जाधववाडी, सिध्दार्थनगर, बसंत-बहार रोड, जयंती नाला पूल, िव्हनस कॉर्नर, शाहूपुरी कुंभार गल्लीसह अन्य ठिकाणी पाणी आले होते.

दरम्यान, शिरोली येथील राष्ट्रीय महामार्गालगत पुराचे पाणी आले आहे. यामध्ये एक ते दीड फुटांनी वाढ झाल्यास या महामार्गावर पाणी येऊन तो वाहतुकीसाठी बंद होण्याची शक्यता आहे. शनिवारी रात्री १२ वाजता पंचगंगेची पातळी ४७.८ फूट होती. दुपारनंतर तीनपासून सायंकाळी सहापर्यंत स्थिर म्हणजे ४७.६ फूट अशी स्थिर होती. पुरामुळे जिल्ह्यातील एकूण १४७ राज्य, प्रमुख जिल्हा, इतर जिल्हा व ग्रामीण मार्ग बंद आहेत, तर ९५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांचे स्थलांतर होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पावसाने आज जिल्ह्यात ४५३ कच्च्या व पक्क्या घरांची व ५२ जनावरांच्या गोठ्यांची पडझड झाली. त्याचबरोबर ५०७ सार्वजनिक व खासगी मालमत्तांचे नुकसान झाले. सध्या आलमट्टी धरणातून दोन लाख ९६ हजार ७९४ क्युसेक विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातून ३२ हजार १०० तर राधानगरी धरणातून ४ हजार ३५६ व वारणा धरणातून १६ हजार ७८५ क्युसेक विसर्ग सुरू आहे. यामुळे महापुराचे संकट कायम आहे.

महापुरामुळे नऊ हजार हेक्टर ऊस पाण्यात

महापुरामुळे जिल्ह्यातील १५ हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली आहे. यामध्ये नऊ हजार हेक्टर ऊस पीक आहे. भात, सोयाबीन, भुईमूग यासह अन्य पिकांचे क्षेत्र सहा हजार हेक्टर आहे. ऊस पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांची घालमेल वाढली आहे.

तालुकावार स्थलांतर

स्थलांतरित कुटुंबे, नागरिक, जनावरे

तालुका कुटुंबे नागरिक जनावरे

करवीर २९८ १००३ --

हातकणंगले ०७ २६ २५०

चंदगड १२ १४३ ११०

इचलकरंजी (महापालिका) १२२ ६२७ १५३

इचलकरंजी (अपर तहसील कार्यालय) ०१ ३० --

कोल्हापूर (महापालिका) १५२ ६०९ १५४

शाहूवाडी २३ ७५ ३७

धरणसाठा (टीएमसीमध्ये)

धरण क्षमता पाणीसाठा टक्केवारी विसर्ग (क्युसेकमध्ये)

दूधगंगा * २५०३९* २१.३५*८४.०८*८१००

तुळशी * ३.४७* ३.२५*९३.७४* २०००

कासारी*२.७७४*२.२८*८२.१०*१४७०

कडवी* २.५१६*२.५२*१००* १४५०

कुंभी*२.७१५*२.२०*८१*३००

पाटगाव*३.७१६*३.६०*९६.८६*२००

चिकोत्रा*१.५२२*१.२४*८१.७६*--

चित्री *१.८८६*१.८९*१००*२००५

जंगमहट्टी*१.२२३*१.२२*१००*९८६

घटप्रभा*१.५६०*१.५६*१००*७९३३

जांबरे*०.८२०*०.८२*१००*१५१४

आंबेओहोळ*१.२४०*१.२४*१००*३०४

सर्फनाला * ०.६७० *०.४८*७१.०६*१४६३

पातळी ४९ फुटांवर गेली, तर रेल्वेसेवा बंद होणार

पंचगंगेची पाणीपातळी ४९ फुटांवर गेली, तर कोल्हापूरची रेल्वे सेवा बंद होणार आहे. अद्याप पंचगंगा नदीवर असलेल्या रेल्वे मार्गावर पाणी आलेले नाही. या मार्गाच्या गर्डलपासून सुमारे पंधरा सेंटिमीटर खाली पुराचे पाणी आहे. त्यामुळे आज रेल्वे सेवा सुरू राहिली. पावसाने थोडी उघडीप दिली असली, तरीही नदीची पाणी पातळी सातत्याने वाढत आहे. रात्री पाणी पातळी ४९ फुटांवर गेली तर कोल्हापूरची रेल्वेसेवा बंद होण्याची शक्यता आहे. पाणीपातळीवर मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे लक्ष आहे.

महापुरातून....

  • शिरोली येथे राष्ट्रीय महामार्गालगत पाणी

  • जिल्ह्यात अडीच हजार नागरिकांचे स्थलांतर

  • शहरात ६०९ नागरिकांचे स्थलांतर

  • जिल्ह्यात ६०४ जनावरांचे स्थलांतर

  • जिल्ह्यातील १५ हजार हेक्टर शेती पाण्याखाली

  • शहरात अनेक ठिकाणी पाणी येऊन वाहतूक बंद

  • जिल्ह्यात ४५३ घरे व ५२ गोठ्यांची पडझड

  • सार्वजनिक व खासगी ५०७ मालमत्तांचे नुकसान

  • १६ मंडल विभागामध्ये ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस

  • शहरात पुराचे पाणी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

SCROLL FOR NEXT