kolhapur hatkanangale shivsena mp dhairyasheel mane given self home for quarantine 
कोल्हापूर

क्वारंटाइनसाठी स्वत:चे घर देणारे देशातील 'हे' आहेत पहिले खासदार

सकाळ वृत्तसेवा

रुकडी (कोल्हापूर) : कोरोना महामारीच्या पाश्र्वभूमीवर परजिल्ह्यात गेलेले नागरीक मोठ्या संख्येने घरी परतत आहेत. अशा व्यक्तींना गावी परत आल्यानंतर गावाबाहेर विलगिकरण कक्षात 14 दिवस प्रतिकुल परिस्थितीत रहावे लागते. त्यांच्या घरच्यांनाही कोरोनाच्या भितीपोटी त्यांना दूर ठेवावे लागत आहे. यामुळे बाहेरून येणाऱ्यांना मिळणाऱ्या वागणुकीमुळे दुरावा वाढत असून समाज व्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामूळे खासदार धैर्यशील माने यांनी परजिल्ह्यातून येणाऱ्या लोकांना विलगीकरणासाठी रुकडीतील त्यांचे स्वतःचे घर 'आपुलकी गृह' म्हणून दिले. यावेळी दरवाज्यावर त्यांनी 'बांधिलकी आपुलकीची, विलगीकरणातील जिव्हाळ्याची अन् माणूसकीची...'अशी पाटी लावली आहे.

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान,  मुंबई, पुणे, सोलापूर, कराड अशा रेड झोनमधून नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणानिमित्त गेलेले सध्या गावाकडे येत आहेत. त्यांची आरोग्य तपासणी केल्यानंतर निगेटीव्ह रिपोर्टस आलेनंतरही विलगीकरण कक्षात ठेवले जाते. मात्र बऱ्याच ठिकाणी विलगीकरण कक्षातील असुविधा व आरोग्यास अपायकारक वातावरणामुळे तेथे राहणे म्हणजे एखादा आजार ओढावून घेणेसारखे आहे. अशा परिस्थितीत शासनालाही मर्यादा पडत आहेत. या परिस्थितीवर मात करता येवू शकते हे खासदार धैर्यशील माने यांनी आपल्या कृतीतून दाखवून संपूर्ण देशापुढे एक नवा आदर्श घालून दिला. त्यामूळे सर्व ठिकाणी अशा प्रकारे बाहेरून येणाऱ्यांसाठी त्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह असेल तर समाजाने तसेच भावकीने पुढाकार घेऊन आपले घर मोकळे करुन द्यावे असे आवाहन खासदार माने यांनी यावेळी केले.

कै.खासदार बाळासाहेब माने यांच्या कार्याच्या वारसाची चर्चा...
महापूरावेळी मदतीसाठी झटणारे खासदार धैर्यशील माने हे खऱ्या अर्थाने लोकनेते खासदार कै. बाळासाहेब माने यांच्या कार्याचे वारसदार बनले असून कोरोना सारख्या मोठ्या आपत्तीमध्येही जनतेसाठी कार्य करत आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे त्यांनी जनता व प्रशासन यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवला आहे. या लढाईत विजयी होण्यासाठी भावूबंदकीचे वाद बाजूला ठेवून आपल्याच माणसांसाठी आपलीच घरे उपलब्ध करुन देण्याचे आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी केले आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT