विवाह नोंदणीचा दाखला देण्याकरीता लाच घेणाऱ्यास अटक Sakal
कोल्हापूर

हातकणंगले : विवाह नोंदणीचा दाखला देण्याकरीता लाच घेणाऱ्यास अटक

ग्रामीण रुग्णालयांतील ही पहिलीच घटना असल्याने वैद्यकीय क्षेत्रांत खळबळ उडाली आहे.

अतुल मंडपे

हातकणंगले : विवाह नोंदणीचा दाखला देण्याकरीता तीन हजार रुपयांची लाच स्विकारताना हातकणंगले ग्रामीण रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक सुधीर अमितचंद चौधरी ( व.व.४५ )रा. रूक्मिणी हाऊसिंग सोसायटी, संजयनगर, सांगली व त्याचे खाजगी हस्तक सचिन शिवाजी भोसले (व.व.२६ ) रा. नेज आणि सौरभ अरविंद नेर्ले. ( व.व.२४ )रा.नेज यांना आज लाचलुचपत विभागच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. याबाबतची तक्रार पृथ्वीराज पाटील ( वय २७ ) रा. हातकणंगले याने दिली होती.पंधरा दिवसांत हातकणंगलेतील ही दुसरी कारवाई असून ग्रामीण रुग्णालयांतील ही पहिलीच घटना असल्याने वैदयकिय क्षेत्रांत खळबळ उडाली आहे.

अधिक माहिती अशी, हातकणंगले येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये सुधीर चौधरी हा तीनच महिन्यांपूर्वी कनिष्ठ लिपिक म्हणून रुजू झाला आहे. त्याच्याकडे विवाह नोंदणीचे काम होते. मात्र हजर झाल्यापासून त्याच्या बाबत तक्रारी होत्या. यातील तक्रारदाराची विवाह नोंद करून त्यावरील दाखला देण्यासाठी तक्रारदाराकडून रूपये तीन हजारची लाच मागणी केली होती. याबाबत लाचलुचपत विभागांकडे तक्रार आल्यानंतर त्यांनी २२ तारखेपासून आजवर पाच ते सहा वेळा सापळा लावला. अखेर आज ते तिघेही जाळ्यात सापडले. सदर लाचेची रक्कम स्वीकारताना सुधीर चौधरी सह सचिन भोसले आणि सौरभ नर्ले या दोन खाजगी एजंटांना लाचलुचपत विभागाने आज रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज बुधवारी दुपारी करण्यात आली.

पो.उपअधीक्षक आदीनाथ बुधवंत यांच्‍या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. संजीव बंबरगेकर, पो.ना. विकास माने, सुनिल घोसाळकर, पो.कॉ. रुपेश माने,चालक पो. शि. सुरज अपराध. आदींनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT