kolhapur Home quarantine Five people try to escape 
कोल्हापूर

धक्कादायक ; "होम क्वॉरंटाईन' पाच जणांचा पळून जाण्याचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - खिद्रापुर (ता. शिरोळ) येथील मज्जीदमधील होम क्वॉरंटाईन करण्यात आलेल्या 14 जणांपैकी पाच जणांनी आज राजापूर धरण रस्त्यामार्गे नाका बंदीस असलेल्या कोरोना प्रतिबंधक ग्रामस्तरिय समितीस चकवा देऊन पलायन करण्याचा प्रयत्न केला. याठिकाणी बंदोबस्तावर असलेले सामाजिक कार्यकर्ते जहागीर सनदी यांच्यामुळे त्यांचा हा प्रयत्न फसला. 

सनदी यांनी त्यांना अडवून कोठे जात असल्याचे विचारले. यावेळी त्यांनी वेगवेगळी उत्तरे दिल्याने सनदी यांनी अतिशय चाणाक्षपणे त्यांना रोखून धरून सरपंच हैदरखान मोकाशी, पोलीस पाटील दीपाली पाटील यांना फोन करून बोलावून घेतले. सरपंच व पोलीस पाटील यांनी पोलीस ठाण्याशी सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत निरावडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. लॉकडाऊन संपेपर्यंत या लोकांना गावाच्या बाहेर न सोडण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पलायन होणाऱ्या लोकांना सूचना देऊन पुन्हा मज्जीदीत ठेवण्यात आले. 
यावेळी बंदोबस्तास श्रीपाद रायनाडे, विजय रायनाडे, गजानन घस्ते हे होते. जहांगीर सनदी , मियाखान मोकाशी, हैदरखान मोकाशी, बसगोंडा पाटील , ग्रामसेवक महालींग अकिवाटे, गजानन घस्ते, बाबासो चिक्कोडे, सोन्या कागवाडे, विजय रायनाडे, श्रीपाद रायनाडे, गणेश पाखरे, सुधीर सुतार झटत आहेत. बेकायदेशीर गुटखा कारवाई नंतर या दुसऱ्या कारवाईने कुरुंदवाड परिसरात पोलिसांचे कौतुक होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT