gokul sakal media
कोल्हापूर

कोल्हापूर : ‘गोकुळ’मध्ये हस्तक्षेप नाही; लक्ष देऊ

पालकमंत्री सतेज पाटील; पाच जिल्ह्यांचा गोकुळ एकच ब्रॅंड करणार : मंत्री हसन मुश्रीफ

सकाळ ऑनलाईन टीम

कोल्हापूर: दुधाची वाढती मागणी पाहता, ते दूध कमी प्रतीचे आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. ‘गोकुळ’मध्ये सत्ता मिळवण्यासाठी उत्पादकांना आम्ही अभिवचन दिले आहे. त्यामुळे आम्हाला लक्ष द्यावे लागले, आमचा हस्तक्षेप नाही, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली तर कोल्हापूर, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा हे पाच जिल्हे दूध संघांकडून संकलित होणाऱ्या दुधाचा ‘गोकुळ’ एकच ब्रॅंड करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, ‘गोकुळ’मध्ये सतेज पाटील यांचा हस्तक्षेप होतो; पण मुश्रीफ यांचा होत नाही, म्हणून दोघांत भांडण लावण्याचा प्रयत्न करू नका, असे आवाहन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘गोकुळ’च्या संचालिका शौमिका महाडिक यांना केले. श्री. पाटील, श्री. मुश्रीफ पत्रकार परिषदेत बोलत होते.

मंत्री पाटील म्हणाले, ‘गोकुळ’मध्ये सत्ता परिवर्तन करताना आम्ही नेतृत्व केले आहे; पण आम्ही लक्ष द्यायचे नाही का? निवडणुकीत लोकांना आणि उत्पादकांना चार पैसे जास्त मिळवून देण्यासाठी अभिवचन दिले. आम्हाला मोठ्या विश्‍वासाने सत्ता दिली. आम्ही त्यांच्याशी बांधिल आहोत, उद्या काहीही घडले तर त्याला जबाबदार आम्हीच आहे. ‘गोकुळ’मध्ये आमचा हस्तक्षेप नाही; पण आम्हाला लक्ष दिलेच पाहिजे, त्यामुळे दोन्ही बाजूंनी हलगी वाजवू नका, अशी विनंतीही त्यानी केली.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, दूध उत्पादन वाढविण्यासाठी जिल्हा बॅंकेतर्फे ५०० कोटींहून अधिक कर्ज दिले. म्हशीच्या दुधात वाढ झालीच पाहिजे. तीन ते चार महिन्यांत उष्णता वाढली, त्यामुळे दूध संकलनही घटले. दूध संकलनासाठी संघाला प्रयत्न करावे लागणार आहेत. राजकारणात आरोप प्रत्यारोप होत राहतील, मात्र, संघावर परिणाम होईल, अशा गोष्टी संचालकांनी टाळल्या पाहिजेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election 2026 : महायुतीत धुसफुस! पाडापाडीचं राजकारण, भाजपनं मदत केली नाही, समाधान सरवणकरांच्या आरोपानंतर चॅट व्हायरल

Mumbai News: बीडीडीवासीयांना मिळणार भाडेवाढ, दरमहा ३० हजारांचा म्हाडाचा प्रस्ताव; रहिवाशांना दिलासा

Smart Phone: सोनं,चांदी,तांबे... तुमचा फोन किती प्रकराच्या धातूंनी बनलेला असतो? वाचा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर -गगनबावडा मार्गावर भीषण अपघात, एक ठार, एकजण गंभीर

Jobs : झटपट नोकरी पाहिजे? 'या' ठिकाणी सुरू आहेत AI पासून मार्केटिंग, HR, अकाउंटिंगपर्यंतचे 100 कोर्स, तेही एकदम फ्री..कोणतीच फी नाही

SCROLL FOR NEXT