kolhapur jotiba dongar festival impact in covid19 
कोल्हापूर

ऐन नवरात्र उत्सवात जोतिबा डोंगर राहणार पहिल्यांदाच सुना -सुना

निवास मोटे

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दख्खनचा राजा जोतिबा देवाचा नवरात्रोत्सव यंदा भाविकांविनाच साजरा होणार आहे. जोतिबा मंदिरात नवरात्रोत्सव काळातील सर्व धार्मिक विधी मोजक्‍याच लोकांच्या उपस्थितीत होणार असले तरी दरवर्षीप्रमाणेच नवरात्रोत्सव पारंपरिक पद्धतीने होणार आहेत. नवरात्रोत्सवातील जोतिबा देवाच्या दररोजच्या सोहन कमळ पुष्प रूपातील सांलकृत पूजा, धुपारती   व इतर धार्मिक विधी नेहमीप्रमाणे होणार असल्याची माहिती पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अधीक्षक महादेव दिंडे यांनी दिली .   


 दरम्यान,जोतिबा डोंगरावर'दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सवाची तयारी केली जात आहे. मंदिराची स्वच्छता, रंगरंगोटीसोबत मंदिराला विद्युत रोषणाईही केली जाणार आहे. मोजक्‍याच लोकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी केले जातील. दरवर्षी नवरात्रोत्सवात रोज हाजारो भाविक जोतिबा देवाचे दर्शन घेतात. पण यंदा कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या नियमांप्रमाणे भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. उद्या ( ता. १२ )जोतिबा डोंगरावर सर्व मंदिरे शिखरे गाभारे व देवपूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या साहीत्याची स्वच्छता केली जाणार आहे . तसेच येत्या शनिवारी ( ता. १७ ) मंदिरात ढोल पिपनी सनई यांच्या गजरात घटस्थापनेचा विधी होईल.

संपादन - अर्चना बनगे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT