कोल्हापूर

कोल्हापूर : जोतिबा डोंगर झाला हाउसफुल्ल

सलग सुट्या, कोरोना निर्बंधाच्या धास्तीने पर्यटकांची गर्दी

सकाळ वृत्तसेवा

जोतिबा डोंगर : नाताळची सुटी(christmas holiday) तसेच कोरोनानंतर येणाऱ्या ओमिक्रॉनच्या(omicron) धास्तीमुळे आज राज्यभरातील भाविकांनी दर्शनासाठी जोतिबा डोंगर(jotiba temple) गाठला. परिणामी, डोंगर हाउसफुल्ल झाल्याचे चित्र होते. दिवसभरात दीड लाख भाविक डोंगरावर आले. मिनी चैत्र यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. गर्दीमुळे दोन किलोमीटर अंतरापर्यंत दर्शन रांग लागली. लॉकडाउन(lockdown) झाल्यावर देवाचे दर्शन घेता येणार नाही या भीतीने आज भाविक सहपरिवार डोंगरावर दाखल झाले. गर्दीमुळे यंत्रणेवर मोठा ताण पडला.

भाविकांचे प्रचंड हाल झाले. मंदिरात पहाटे घंटानादानंतर धार्मिक विधीस प्रारंभ झाला. पाद्यपूजा, काकड आरती मुखमार्जन झाले. त्यानंतर अभिषेक विधी झाला. श्रीची सरदारी महापूजा बांधण्यात आली होती. पहाटेपासूनच डोंगर गर्दीने फुलून गेला होता. रात्री पालखी सोहळा झाला. पालखीवर गुलाल खोबऱ्याची उधळण झाली. ‘चांगभलं’च्या जयघोषाने मंदिर परिसर दणाणून गेला होता.दिवसभर उन्हाचा तडाखा होता. उन्हात उभे राहून सर्रास भाविकांनी दर्शनाचा आनंद लुटला. ठाकरे मिटके गल्लीतून एसटी बसस्थानकापर्यंत दर्शन रांग लागली. मंदिर परिसर, सेंट्रल प्लाझा, यमाई मंदिर व बाग या ठिकाणी भाविकांनी विसावा घेतल्याचे चित्र होते. डोंगरावर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. बहुतांश भाविकांकडे मास्क नव्हते. कोडोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार डोईजड यांच्या मार्गदर्शनाखालीबंदोबस्त होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

४८ तास धोक्याचे! राज्यात पावसाचा जोर कायम राहणार; घाटमाथ्यावर 'रेड अलर्ट', मुंबईसह अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

NEET Protest : सरकारकडून चर्चेची तयारी, तर दुसरीकडे मेट्रोची १५ स्टेशन्स बंद; राजधानीत काय घडतंय?

Live Updates Marathi : कॉंग्रेस कार्यालयाबाहेर भाजपचे आंदोलन

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशी IN, रिंकू सिंगचे पुनरागमन, एकाचे पदार्पण! पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची Playing XI

Dharmendra Pradhan Resignation Letter : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे पत्र व्हायरल; सोशल मीडियावर फिरणाऱ्या पत्रामागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT