kolhapur kannur people help to boy 
कोल्हापूर

...अखेर आठ महिन्यांनी स्वप्नील पोहोचला घरी! 

दीपक कालकुंद्रीकर

कुदनूर (कोल्हापूर) - मागच्या आठवड्यात दाढी वाढलेला वीसेक वर्षाचा तरूण कालकुंद्री (ता. चंदगड) गावात भटकत आला होता. त्याच्या अवतारावरून कुणीतरी खुळा असावा, असा अनेकांचा ग्रह झाला. त्यात कोरोनाची दहशत.. त्यामुळे त्याच्याजवळ जायला कुणीही तयार नव्हते. खूप दिवस उपाशी असल्यामुळे त्याला धड बोलता येत नव्हते. भरत कांबळे यांनी न राहवून त्याला जेवण दिल. माजी सरपंच दयानंद कांबळे व गजानन गावडू पाटील यांनी त्याला बोलता करायचा प्रयत्न केला.

चार दिवसांनी त्याने आपले नाव स्वप्नील पवार असून पुणे जिल्ह्यातील शिवली-भडवली गावचा असल्याचे त्याने सांगितले. गजानन पाटील यांनी पुणेस्थित शिक्षक मित्र राजेंद्र हेंडोळे यांच्याकरवी त्यांच्या कुटूंबियांशी संपर्क साधून माहिती घेतल्यावर स्वप्नील आठ महिन्यापासून गायब असल्याचे समजले. तोपर्यंत राहूल शंकर जाधव, सुनील आनंद पाटील, किरण जोशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याच्या जेवणाची जबाबदारी उचलली.

रमजानने त्याचे केस कापण्यासाठी सहकार्य केले, तर शिराज मुल्लाने त्याला अंथरूण दिले. गजानन गावडू पाटील यानी गावातील दानशूर व्यक्तींकडून 2200 रूपयांची मदत गोळा करून त्याच्या भावाकडे प्रवास खर्चासाठी दिली. आज त्याचा भाऊ बसने त्याला नेण्यासाठी आला. दयानंद कांबळे, गजानन गावडू पाटील व उपस्थित ग्रामस्थांनी जमा केलेली मदत देत त्याच्या भावाकडे सुखरूप सुपूर्द केले. या वेळी स्वप्नील व त्याच्या भावाचे डोळे कृतज्ञतेने ओले झाले होते, तर ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच आत्मिक समाधान जाणवत होते. 
 

आठ महिन्यापासून स्वप्नीलचे कुटूंबीय त्याला शोधत आहेत. कंटाळून त्यानी त्याला शोधायचे बंद केले होते. स्वप्नीलला त्यांच्या कुटूंबियाना पुन्हा जोडल्यामुळे शब्दात सांगता न येणारा आनंद झाला आहे. यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व तरूणांचे व देणगीदारांचा आभारी आहे. 

- गजानन पाटील 

 संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावं- प्रसाद लाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT