कोल्हापूर

Kolhapur : विरोध झुगारून विस्तारीकरण करणारच ; अमल महाडिक

कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीकरणाला विरोध करणारे विरोधकच

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीकरणाला विरोध करणारे विरोधकच विस्तारीकरण का केले नाही म्हणून विचारताहेत. मात्र, कोणी कितीही विरोध केला तरी वर्षात कारखान्याचे विस्तारीकरण करणार असल्याची ग्वाही माजी आमदार अमल महाडिक यांनी आज दिली.

तसेच, डी. वाय. पाटील कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्यांची राजाराम कारखान्यात पोळी भाजणार नाही, अशी टीकाही त्यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर केली. प्रयाग चिखली येथे झालेल्या सभेत ते

बोलत होते. महाडिक म्हणाले, ‘आजतागायत कारखान्याच्या विस्तारीकरणाला विरोध करणारी मंडळीच आज विस्तारी करणाबाबत आम्हाला विचारणा करत आहेत. या गोष्टी सभासद शेतकरी जाणून आहे. कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभांमध्ये विरोधकांनी विस्तारीकरणाला केलेला विरोध सर्व सभासदांनी पाहिला आहे. मी विरोधकांना सांगू इच्छितो, इथून पुढे कोणी कितीही विरोध केला तरी राजाराम कारखान्याचे विस्तारीकरण हे होणारच. गगनबावड्यातील

डी. वाय. पाटील कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांचे नुकसान करण्याचे काम ज्यांनी केले, तेच आज शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचे ढोंग करत आहेत; पण ही लबाडी राजाराम कारखान्याचा सूज्ञ शेतकरी सभासद चांगलाच ओळखून आहे. त्यामुळेच त्यांची पोळी इथे भाजली जाणार नाही, याची खात्री आता विरोधकांनाही पटलेली आहे.’ यावेळी बटूसिंग रजपूत, रघुनाथ पाटील, पांडबा यादव, संभाजीराव पाटील, हंबीरराव वळके, बी. आर. शिंदे, केवलसिंग रजपूत, धनाजी चौगले, बाळासाहेब वरूटे, बाजीराव पाटील, सुभाष पाटील, सर्जेराव पाटील यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Drug Inspector Exam Paper Leak : नीट नंतर आता MPSC चाही पेपर फुटला? औषध निरीक्षक भरती वादाच्या भोवऱ्यात, विद्यार्थ्यांचे गंभीर आरोप

आंदोलन आहे म्हणजे लाठीचार्ज करा असं नाही; पोलीस कारवाईवरून सरन्यायाधीशांनी सुनावलं, दिले शिस्तीचे धडे

Latest Marathi News Live Update : पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा, मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत; मंत्री रामदास आठवले काय म्हणाले?

IPL 2027 Trade: हार्दिक पांड्यासाठी २० कोटींचं पॅकेज? CSK ने दोन खेळाडूंच्या अदलाबदलीसह Mumbai Indiansला दिली भारी ऑफर

Mumbai News: मुंबईकरांसाठी गुडन्यूज! महालक्ष्मी येथे स्वयंचलित पादचारी पूल खुला होणार, २० मिनिटांचं अंतर कमी होणार

SCROLL FOR NEXT