Kolhapur  Sakal
कोल्हापूर

Kolhapur : हद्दवाढ कृती समितीचे आंदोलन; शहरातील KMT बससेवा ठप्प

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील केएमटीचे तोट्यातील मार्ग बंद करण्यासाठी कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समिती व समन्वय समितीच्या वतीने केएमटी च्या बुद्ध गार्डन येथील वर्कशॉप समोर पहाटे पाच वाजल्यापासून बस रोखून धरल्या आहेत. पहाटे केएमटीचे कोणीही अधिकारी उपस्थित न राहिल्याने आंदोलकांनी अखेर ठिय्या मारला आणि शहरातली बससेवा ठप्प झाली. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

(Kolhapur KMT Bus Latest Updates)

दरम्यान, कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समिती व समन्वय समितीकडून केएमसाठीचे तोट्यातील रस्ते बंद करण्यासाठी आणि इतर मागण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक टीना गवळी यांनी टप्प्याटप्प्याने मार्ग बंद केले जातील असे आश्वासन आंदोलकांना दिले. पण तोट्यातील मार्ग बंद होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार हद्दवाढ कृती समितीने केला त्यामुळे हा वाद चिघळला आहे. त्यामुळे आज शहरवासियांना फटका बसला आहे.

दरम्यान, ज्या गावांकडून हद्दवाढीसाठी विरोध करण्यात येत आहे अशा गावांतील बससेवा रद्द करण्यात यावी अशी मागणी कृती समितीकडून करण्यात आली होती. पण प्रशासनाकडून कोणतीच कारवाई केली नसल्याने बस रोखणार असल्याचा इशारा कृती समितीचे बाबा इंदुलकर यांनी दिला होता. यासंदर्भात त्यांनी महालालिका प्रशासन आणि पोलिस अधीक्षकांना पत्रकाद्वारे माहिती दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Maratha Reservation: मनोज जरांगेंचा मुंबईकडे प्रवास सुरू; दोन वाहने आणि दोन रुग्णवाहिका सोबत, पाटोद्यात पहिला मुक्काम

Suryakumar Yadav: B. Com च्या दिवसांत असा दिसायचा सूर्या! त्याच्याच कॉलेजने शेअर केले अनसीन Photo; एकदा पाहाच

बुलडोझर कारवाईत मर्यादा ओलांडली; हायकोर्टानं अधिकाऱ्यांना फटकारलं, इमारत पुन्हा बांधा आणि १० लाख देण्याचे आदेश

Latest Marathi News Update : धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

SCROLL FOR NEXT