sakal
कोल्हापूर

कोल्हापूर: कळंबा परिसरात चाकू हल्ला; तिघे जण जखमी

जेवणाची ऑर्डर वेळेत न मिळाल्याचा जाब विचारल्यावरून झालेल्या चाकू हल्ल्यात तिघे जण गंभीर जखमी झाले. Kolhapur: Knife attack in Kalamba area; Three people were injured srs97

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर: जेवणाची ऑर्डर वेळेत न मिळाल्याचा जाब विचारल्यावरून झालेल्या चाकू हल्ल्यात तिघे जण गंभीर जखमी झाले. स्वरूप बाळासाहेब माळी (वय ३०, रा. सानेगुरुजी वसाहत), सुजित गजानन भोसले, आदित्य मिलिंद नागवेकर (दोघे रा. मंगळवार पेठ) अशी जखमींची नावे आहेत. कळंबा साई मंदिरा जवळील खाऊ गल्लीत बुधवारी रात्री हा प्रकार घडला.

याप्रकरणी चौघा संशयितांवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांची नावे - पंकज विभुते (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) आणि चायनीज सेंटरवरील तिघे अनोळखी कामगार अशी आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्वरूप माळी हे बुधवारी (ता.१५) आपल्या मित्रांसह कळंबा साई मंदिर येथील खाऊ गल्लीतील चायनीज सेंटरवर गेले होते. लवकर जेवण न मिळल्याने त्याचा जाब विचारला.

याच रागातून सेंटरचा मालक संशयित पंकजसह तिघा अनोळखींनी कांदा कापण्याच्या चाकूने स्वरूप, सुजित आणि आदित्य या तिघांवर चाकूने हल्ला करून जखमी केले. अशी फिर्याद स्वरूप माळी यांनी दिली. याबाबतचा तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल बजरंग लाड करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Alert: मुंबईत पावसाची रिपरिप सुरूच, पुढील काही दिवस अलर्ट जारी; हवामान विभागाची महत्त्वाची माहिती

आशीष शेलार आमच्या सोबत या! उद्धव ठाकरेंनी केलं शेलारांचे कौतुक, फडणवीसांना ठरवलं पप्पू?

Latest Marathi News Live Update : पुणे-बेंगळुरू महामार्गावर भीषण अपघात

६० व्या वाढदिवसाला शाहरुख मन्नतबाहेर आलाच नाही; पोस्ट करत सांगितलं कारण, म्हणाला, 'माफी मागतो पण...

अर्ध शरीर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा मदतीसाठी टाहो, बाजूला २० मृतदेह पडलेले; घटनास्थळी हादरवणारं दृश्य

SCROLL FOR NEXT