kolhapur let night crocodile found in rajaram dam Citizens are urged to be careful 
कोल्हापूर

सावधान : पोहायला जाताय मग ही बातमी वाचाच

संभाजी गंडमाळे

कोल्हापूर : कसबा बावडा ते वडणगे परिसराला जोडणाऱ्या
राजाराम बंधाऱ्यावर काल रात्री सव्वा एक वाजता सहा फुटाच्या मगरीचे दर्शन झाले. बंधार्‍यावरून पुनाळला जाणाऱ्या युवकांना पुलावर थांबलेली मगर दिसली.रात्री 1.30 च्या दरम्यान  ती वडणगे जॅकवेलच्या बाजूला नदीत गेली.

बावडा रेस्क्यू फोर्सचे निलेश पिसाळ यांना हे कळताच पिंजार गल्लीतील मुलांसोबत बंधाऱ्यावर गेले आणि मगर कुठे जाते ते पाहिले. रात्री ही मगर वडणगे जॅकवेलच्या बाजूने गेली असून तिची शोधमोहीम आता सुरू होणार आहे.


गेली काही दिवस या परिसरात मगरीचे अस्तित्व आढळून आले आहे. प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितल्यानंतर वन विभागाच्यावतीने या परिसराची पाहणी करण्यात आली. यावेळी प्रत्यक्ष मगर आढळून आली नाही. मात्र तीच्या अस्तित्वाचे ठसे काही ठिकाणी पाहायला मिळाले होते. आता पुन्हा थेट बंधाऱ्यावरच मगर दिसली असून या परिसरात पोहायला येणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Supply: सांडपाणी भागवणार मुंबईकरांची तहान, रिसायकल करून पाणी देण्याची BMCची योजना

Kolhapur Ambabai Temple : श्री अंबाबाईच्या ओटीत साडीऐवजी कागदाची रद्दी; भाविकांच्या श्रद्धेशी खेळ; प्रशासनाचे दुर्लक्ष

Ayodhya Ram Mandir: अयोध्येत रामललाच्या दर्शनाची वेळ आणि नियम अचानक बदलले; आता VIP पास सुद्धा बंद, काय आहे कारण?

'मराठी सिनेमासाठी काय करतोय?' विलासराव देशमुखांनी रितेशला विचारलेला प्रश्न, वडिलांची इच्छा सांगताना म्हणाला...'सध्या मराठी भाषेला..'

Chakan News : काळ्या ऑइलवरील शेगड्यांकडे कल; चाकण परिसरामधील छोट्या हॉटेलचालकांना मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT