कोल्हापूर

Kolhapur Lockdown : अख्खे शहर सामसूम, पोलिसांचा चोख बंदोबस्त

दुसऱ्या दिवशीही कोल्हापूरकरांचा लॉकडाउनला प्रतिसाद

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : लॉकडाउनला (lockdown) दुसऱ्या दिवशीही नागिरकांचा प्रतिसाद मिळाला. केवळ मेडिकल इमर्जन्सी (medical immergency) कारणाशिवाय इतर कोणीही रस्त्यावर दिसत नव्हते. शिरोली आणि कावळानाका परिसरातच कारणाशिवाय आत सोडले जात नव्हते. पेट्रोल पंपावरही नोंदी करून घेतल्या जात होत्या. रस्त्यावर क्वचितच एखादे वाहन दिसत होते. अन्यथा अख्खे शहर (kolhapur city) सामसूम असल्याचे दिसून आले.

कालपासून जिल्ह्यात कडक लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे. त्याला नागरिकांनी प्रतिसाद दिला. आज लॉकडाउनच्या दुसऱ्या दिवशीही शहर सामसूम होते. केवळ वैद्यकीय उपचार घेण्यासाठी येणाऱ्यांनी सोबत औषधोपचाराची कागदपत्रे, फाईल जवळ ठेवली होती. त्याचीही खात्री पोलिसांकडून केली जात होती. शहरातील प्रमुख चौकात, रस्त्यावर पोलिसांचा खडा पहारा होता. काही ठिकाणी पोलिसांना (kolhapur police) सरबत, चहा देण्यासाठी एक-दोन सामाजिक संघटनानीही पुढाकार घेतला.

काही परगावांहून आलेल्या रुग्णांकडे इ-पास (e-pass) होते. तर काही मोटारींत स्वतः रुग्ण, दवाखान्याची फाईलच सोबत ठेवली होती. कावळा नाका, दाभोळकर चौक, दसरा चौक, सीपीआर चौक, बिंदू चौकात ही बॅरिकेड लावून प्रवाशांकडे विचारणा केली जात होती. संभाजीनगर परिसरातही पोलिसांकडून ग्रामीण भागातून आलेल्यांना कारण विचारले जात होते.

रस्त्यावर क्रिकेट

उपनगर परिसरात रस्त्यावर क्रिकेटचा खेळ मांडल्याचा दिसून येत होते. तर पोलिसांची गस्तीची गाडी येताच सर्वजण धूम ठोकत असल्याची स्थिती होती. झोपडपट्टी भागात अख्ख कुटुंबच झोपडीसमोर रस्त्याकडेला बसून वेळ काढत असल्याचे चित्र होते. विक्रमनगर, टेंबलाई फाटकाजवळील आणि उड्डाणपुलावरील गर्दी आज दिसत नव्हती, शाहूपुरी, मध्यवर्ती बस स्थानक परिसरात ही सामसूम होते.

गर्दीच्या ठिकाणी शांतता

आठवडाभर ज्या लक्ष्मीपुरी, कोळेकर तिकटी, मिरजकर तिकटी परिसरात गर्दीचा पूर असायचा त्या ठिकाणी आज निरव शांतता होती. काही ठिकाणी पोलिस दिसत नव्हते. तरीही रस्त्यावर कोणीही नव्हते. रेल्वे सुरू असल्यामुळे आज दुपारी असलेल्या पुण्याच्या रेल्वेगाडीसाठी काही प्रवासी थांबून होते. त्यांना पुण्यातून अन्य ठिकाणी प्रवास करायचे असल्याचेही त्यांनी सांगितले. रेल्वेस्थानकात आत प्रवेश दिला जात नसल्यामुळे त्यांनी रेल्वेस्थानक परिसरासमोर मिळेल त्या ठिकाणी थांबून गाडीची वाट पाहिली. तेथेही हाताच्या बोटावर मोजणारे प्रवासी दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT