kolhapur maratha community altimet to maharashtra government 
कोल्हापूर

...अन्यथा राज्य सरकारशी संघर्ष अटळ ; मराठा समाजाचा इशारा 

संदीप खांडेकर

कोल्हापूर : पोलिस मेगा भरतीत मराठा समाजाच्या हक्काच्या तेरा टक्के जागा राखीव ठेवाव्यात किंवा भरती प्रक्रिया रद्द करावी. अन्यथा राज्य शासनाशी संघर्ष अटळ असून, जर मराठा विद्यार्थी व युवकांचे जीवन उध्वस्त झाले तर त्याची संपूर्ण जबाबदारी राज्य शासनाची राहील, असा इशारा सकल मराठा समाजाच्या बैठकीत आज देण्यात आला.

एका बाजूला मराठा आरक्षण स्थगिती व दुसऱ्या बाजूला पोलिस मेगा भरती यामुळे मराठा समाजात प्रचंड खदखद सुरू आहे. आरक्षण स्थगितीमुळे लाखो विद्यार्थ्याच्या हातातोंडाशी आलेले प्रवेश ऐन वेळी रद्द होत आहेत. यामुळे मराठा विद्यार्थी मानसिक दडपणात आहेत. नेमक्या याच वेळी राज्यामध्ये मेगा पोलिस भरती करण्याचे जाहीर केल्याने मराठ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा प्रकार केल्याचे स्पष्ट करण्यात आले.

राज्यात 34 टक्के मराठ्यांना नगण्य समजणे, ही बाब शासनाला पेलणारी नाही. तेव्हा हक्काच्या तेरा टक्के जागा पोलिस भरतीमध्ये राखीव ठेवाव्यात किंवा ही पोलिस भरती रद्द करावी. याबाबत त्वरित निर्णय घ्यावा. अन्यथा मराठा समाज ताकदीने रस्त्यावर उतरेल, असे ठरविण्यात आले.

यावेळी सकल मराठा समाजाचे वसंतराव मुळीक, इंद्रजीत सावंत, दिलीप देसाई, हर्षल सुर्वे, शाहीर दिलीप सावंत, संदिप देसाई, संजय जाधव, धनंजय सावंत, दिगंबर फराकटे, कमलाकर जगदाळे, सुशिल भांदिगरे, विकास जाधव, श्रीधर गाडगीळ, उदय भोसले, युवराज जाधव, मयूर पाटील, दिगंबर साळुंखे, शशिकांत पाटील, चंद्रकांत बराले, उत्तम जाधव, चंद्रमोहन पाटील, संजय काटकर, संजय जाधव, संग्रामसिंह निंबाळकर, प्रताप नाईक, प्रशांत बरगे, अवधूत पाटील उपस्थित होते.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ancient Temple Mystery : खोदकाम सुरू असताना अचानक बाहेर आले प्राचीन मूर्तींचे अवशेष; ऋषिकेशच्या 'या' मंदिराचा विस्मयकारक इतिहास समोर, मूर्ती नेमकी कोणाची?

आधी हिंदू मुलीशी लग्न, धर्मांतर करुन युट्यूबर म्हणतो, 'पुरुषांची नजर मला माहिती, बुरखा घालणं गरजेचं'

Latest Marathi News Live Update : मुंबईतील चारकोपमध्ये एलपीजी सिलिंडरसाठी रांगा

Gudi Padwa Decoration 2026: गुढी पाडव्याला ‘या’ वास्तु टिप्स फॉलो करा, घरात कधीच भासणार नाही कोणतीही कमतरता

Hasan Mushrif Satej Patil Friendship: मंत्री मुश्रीफांचा फोन, सतेज पाटील यांची साथ; बाहूरन विरोध आतून मदत, गोकुळची राजकीय पेरणी

SCROLL FOR NEXT