spit sakal
कोल्हापूर

Kolhapur : मावा खाऊन थुंकला, पोलिसच दंडात अडकला

सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते.

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते. पण कायद्याच्या पालनकर्त्यानेच हा कायदा मोडला तर, तोही मावा खाऊन…़! होय, अशा कारवाई शहरात आज दुपारी रेल्वेस्थानकावर झाली.

‘थुंकी मुक्त’ चळवळीतील कार्यकर्त्यांनी संबंधित पोलिस कर्मचाऱ्याविरोधात कारवाईचा पावित्रा घेतला, त्यामुळे त्या शाहूपुरी पोलिस ठाण्यातील पोलिसाला दीडशे रुपये दंडाला सामोरे जावे लागले.

दरम्यान, चळवळीतील कार्यकर्त्यांनी संबंधित पोलिसावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शाहूपुरी पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांकडे केली. अखेर पोलिसाने ‘चूक झाली, येथून पुढे असे होणार नाही,’ अशीही शपथ घेतल्याची माहिती चळवळीतील कार्यकर्त्यांनी दिली.

चळवळीतील कार्यकर्ता राहुल चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते दुपारी रेल्वेस्थानक परिसरात थांबले होते. तेथे गाडीत बसूनच एक पोलिस मावा खाऊन खुल्या जागेत थुंकले. ते थुंकल्याचे छायाचित्र ‘थुंकी मुक्त चळवळी’च्या ग्रुपवर व्हायरल झाले. तातडीने तेथे महापालिकेचे पथक आले, त्यांनी संबंधित पोलिसाला दीडशे रुपये दंड केला.

दरम्यान, कार्यकर्त्यांनी दुपारनंतर शाहूपुरी ठाण्यात जाऊन पोलिसावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अधिकाऱ्यांनी त्या पोलिसाला फोन केला तेव्हा त्याने चूक कबूल करून पुन्हा अशी चूक होणार नसल्याचे सांगितले. या वेळी राहुल चौधरी यांच्यासह दीपा शिपूरकर, गीता हासूरकर, विजय धर्माधिकारी, राहुल राजशेखर, ललता आंबी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१५ वर्षांपासून रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग मेपर्यंत पूर्ण होणार, पण...; राज्य सरकारने दिली महत्त्वाची माहिती

T20 WC, IND vs WI: 'माझे ११ सैनिक सज्ज आहेत...' विंडीजच्या सॅमीची टीम इंडियाला सामन्यापूर्वी चेतावणी

Nashik Malti IVF Center : बदलापूर स्त्रीबीज तस्करीचे धागेदोरे नाशिकमध्ये! महापालिकेकडून 'मालती आयव्हीएफ'ला नोटीस

Latest Marathi News Update : मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर शहरात वाहतूक कोंडी

Kolhapur : 'ड्यूटी'वरून एलसीबीचे दोन 'पाटील' भिडले, पोलिस अधीक्षक कार्यालयातच सुपारी देऊन संपविण्याची भाषा

SCROLL FOR NEXT