kolhapur esakal
कोल्हापूर

कोरोनानं घेतला भावाचा बळी; म्हसवेच्या अक्षयनं थाटला विधवा वहिनीशी संसार

विधवा भावजयीशी विवाह करून अक्षयने समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

अरविंद सुतार

कोनवडे : पतीच्या निधनानंतर महिलांना विधवा म्हणून उर्वरित आयुष्य जगताना अनेकदा कुटुंब आणि समाज व्यवस्थेकडून मर्यादा येतात. अशा महिलांना बऱ्याचवेळा कोणत्याही महत्वाच्या कार्यक्रमांना, सण समारभांना उपस्थित राहण्यास परवानगी दिली जात नाही. मात्र या सगळ्याला झुगारुन देते म्हसवे (ता. भुदरगड) येथील अक्षय मोरे या अविवाहित तरूणाने आपल्या मोठ्या भावाच्या पत्नी म्हणजे भावजयसह विवाह केला आहे. आपल्या भावाचा आकस्मित मृत्यू झाल्याने पोरक्या झालेल्या बाळासह भावजयला पत्नी म्हणून स्विकारले आहे. विधवा भावजयीशी विवाह करून अक्षयने समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे. परिसरात त्याच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे.

म्हसवे येथील राहणारे मोतेश मोरे यांचा विवाह तीन वर्षांपूर्वी स्वाती माने हिच्याशी झाला होता. दोघांचा सुखाचा संसार चालू होता. त्यांना एक गोंडस मुलगाही झाला. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. या सुखी कुटुंबातील मोतेश आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना कोरोनाची लागण झाली. दरम्यान त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु झाले. यातच मोतेशचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मोतेश यांच्या मृत्यूने मोरे व माने कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला.

मोतेशच्या म्रुत्युनंतर मोरे व माने कुटुंबीयांनी एकत्र बसून तरुणपणीच वैधव्य आलेल्या स्वातीच्या उर्वरित आयुष्याचा विचार करत असताना मोतेशचा लहान भाऊ अक्षय या अविवाहित तरूणाने आपण स्वातीसह तिच्या बाळाला स्विकारण्यास तयार असल्याचे सांगितले. हा अनोखा मंगल विवाह सोहळा रांगोळी (ता. हातकणंगले) येथे दोन्ही कुटुंबियांच्या व मित्र मंडळीच्या उपस्थित व बिद्री साखर कारखानाचे संचालक मधुकर देसाई व सरपंच सर्जेराव देसाई, पोलिस पाटील परशराम मोरे, बाजीराव देसाई, आनंद देसाई, गणपती देसाई यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. विधवांचा सार्वत्रिक सन्मानाच्या दिशेने असणारा अक्षय व स्वाती यांचा हा पुर्नविवाह समाजासमोर आदर्श असा पुर्नविवाह ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latur Farmer: मुख्यमंत्र्यांचा तातडीचा आदेश! ‘शेतकऱ्याला आवडेल तो बैल द्या’; जिल्हाधिकाऱ्यांना सूचना, आजारी बैल प्रकरणाची घेतली दखल..

Malegaon Child Death : मालेगावात मशि‍दीसमोर खेळताना 5 वर्षीय चिमुकल्याचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू; नागरिकांचा तीव्र संताप, मध्यरात्रीपर्यंत आंदोलन

Latest Marathi News Live Update : शाळेच्या पहिल्याच दिवशी हिंगोलीतील सव्वा लाख विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप

PM Kisan Scheme : शेतकऱ्यांनो लक्ष द्या! 30 जूनपूर्वी 'हे' काम न केल्यास पुढील 2,000 रुपयांचा हप्ता अडकणार; कृषी विभागाचा इशारा

Fan Cooling Tips : सीलिंग फॅनची स्पीड कमी झालीये? नवीन पंखा विकत घेण्यापूर्वी करून बघा 'हे' काम, येईल एसीसारखी थंड हवा

SCROLL FOR NEXT