kolhapur minister organised for Democracy day 
कोल्हापूर

महाविकास आघाडीच्या दरबारात जनतेची गाऱ्हाणी; मंत्री सोडविणार प्रश्‍न 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - सर्किट हाऊस येथे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचा पहिलाच जनता दरबार सुरू आहे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून महिला मोठ्या प्रमाणात या जनता दरबारात सहभागी झाल्या आहेत. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ,पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह सर्व खातेप्रमुख या जनता दरबार मध्ये उपस्थित आहेत. 

या जनता दरबारात महापालिका, शिक्षण, बांधकाम, आरोग्य सेच पोलिस यंत्रणेशी संबंधित तक्रारी दाखल होत आहेत. गावातील रस्ते, अतिक्रमणाच्या प्रश्न यासह अन्य प्रश्न ग्रामस्थांनी, नागरिकांनी मंत्र्यांसमोर आपली गाऱ्हाणी मांडली. या जनता दरबारात तब्बल 900 निवेदने देण्यात आली. निवेदवांवर आणि प्रत्यक्ष मांडलेल्या तक्रारी सोडविण्यासाठी तात्काळ आदेश देऊन हे प्रश्न निर्गत केले. तर काही अडचणीच्या प्रश्‍नावर एक महिन्यात किंवा पुढील लोकशाही दिनात निर्णय घेण्यात येईल किंवा यासंबंधीची माहिती एसएमएसद्वारे आपल्याला कळवू असे सांगण्यात आले. 

या लोकशाही दिनास जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel War: होर्मुजच्या समुद्रधुनीत भारत इराणविरुद्ध युद्धनौका तैनात करणार? ट्रम्प यांच्या आवाहनावर परराष्ट्र मंत्रालयाने दिलं उत्तर

Pune News: सुरक्षारक्षकाच्‍या सतर्कतेमुळे युवती सुखरूप परतली घरी; युवती रात्रभर अंधारात, अन् खडकवासला धरण परिसरात काय घडलं!

Pune Pollution: प्रदूषण रोखण्याची घोषणा हवेतच! पुणे महापालिकेला बांधकाम प्रकल्पांवर सेन्सर बसविण्याचा विसर, धूलिकणांचा आरोग्यावर गंभीर परिणाम..

Javali politics: जावळीच्या राजकारणात शिवेंद्रसिंहराजेच'धुरंधर'; दोन्ही पदांवर भाजपचाच झेंडा, राष्ट्रवादीच्या शिल्पा शिंदे तटस्थ!

Latest Marathi Update: DRDO घनसावंगी तहसील कार्यालयाच्या पथकांची कारवाई

SCROLL FOR NEXT