Radhanagari Dam
Radhanagari Dam esakal
कोल्हापूर

Radhanagari Dam : संपूर्ण कोल्हापूरचं लक्ष लागलेल्या राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

राजू पाटील

धरणातून 2828 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. दरम्यान, नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Kolhapur Rain News : ज्या धरणाकडं संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं, ते राधानगरी धरण (Radhanagari Dam) आज सकाळी 8:15 वाजता पूर्ण क्षमतेनं भरलं आहे. धरणाचा 6 नंबरचा स्वयंचलित दरवाजा उघडण्यात आला आहे.

धरणातून 2828 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. दरम्यान, नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कालपासूनच संभाव्य पूरस्थिती असणाऱ्या भागातील लोकांचं स्थलांतर सुरू केलं आहे.

राधानगरी धरणाच्या स्वयंचलित सात दरवाजा पैकी सहा क्रमांकाचा दरवाजा आज सकाळी आठ वाजता खुला झाला. हे धरण ३४७.५० फुटपातळीला पूर्ण क्षमतेने भरते. मात्र वाऱ्याचा प्रचंड दाब असल्याने ३४७.२० फूट पातळीला हा दरवाजा खुला झाला आहे. यातून चौदाशे पन्नास क्युसेक आणि वीज निर्मितीसाठी चौदाशे असा २८५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सध्या सुरू झाला आहे. पावसाचा जोर कायम असून पाणी पातळी वाढल्यास आणखी दरवाजे खुले होण्याची शक्यता आहे.

कालपासून या धरणाच्या स्वयंचलित दरवाजाबाबत सोशल मीडियावरून अफवांचे पेव फुटले होते. इंचा इंचाने पाणी वाढत असतानाच आधीच पंचगंगा आणि भोगावती नदीला आलेल्या पुराची तीव्रता आणखीन वाढण्याची भीती लोकांमध्ये जागृत झाली होती. दुसरीकडे हे धरण भरलेच पाहिजे हेही मत असताना आज रात्री केव्हाही स्वयंचलित दरवाजे खुले होतील, असा लोकांचा अंदाज होता.

मात्र आज सकाळी आठ वाजता स्वयंचलित दरवाजांनी हा मुहूर्त साधला. वाऱ्याचा प्रचंड दाब असल्याने क्षमतेपूर्वीच सात पैकी सहा क्रमांकचा दरवाजा खुला झाला आहे. यामुळे भोगावतीच्या पुरात आणखीन भर पडणार असून परिणामी उद्यापासून पंचगंगेची पाणी पातळी ही हळूहळू वाढण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: सुनील टिंगरे चौकशीसाठी तयार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT