kolhapur municipal corporation election political leader found candidates who power of man, money and muscle in kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापुतरात राजकीय पक्ष ‘मनी, मॅन, मसल पॉवर उमेदवारांच्या शोधात

डॅनियल काळे

कोल्हापूर : महापालिकेच्या राजकारणात टिकणारे, जिंकण्याची क्षमता असणारे ‘मनी’, ‘मॅन’ पाठोपाठ ‘मसल’ पॉवर असणाऱ्या उमेदवारांचा शोध राजकीय पक्षांकडून घेतला जात आहे. महापालिकेच्या सत्ताकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ताराराणी आघाडी, भाजप आणि शिवसेना पक्षांकडून अशाच उमेदवारांचा शोध सुरू आहे. त्यामुळे पक्षाचा कार्यकर्ता नसला तरी चालेल; पण खर्चाची तयारी असणारे आणि मसल पॉवर असणारे उमेदवार अजेंड्यावर आहेत.

महापालिकेत किंगमेकर व्हायचे तर चांगल्या संख्येने नगरसेवक निवडून आणले पाहिजेत. ८१ नगरसेवक आहेत. बहुमतासाठी ४२ नगरसेवक लागतात; पण कोणत्याही एका पक्षात, आघाडीत ४२ नगरसेवक निवडून आणण्याची क्षमता दिसून येत नाही. त्यामुळे आघाडीचे राजकारण केले जाते. दोन किंवा तीन पक्ष एकत्र येऊन सत्तेच्या चाव्या जातात. जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणायचे तर त्याला खूप आधीपासून फिल्डिंग लावावी लागते. पक्षाबरोबरच उमेदवाराकडेही ताकद असण्याची आवश्‍यकता आहे. अलीकडे पैशाच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचे प्रमाण वाढत आहे.

उमेदवाराचा निवडणूक खर्च ३० लाखांपासून पुढेच होतो. त्यामुळे इतके पैसे खर्च करण्याची क्षमता असणाराच या फंदात पडतो. खर्चाची तयारी असणारा, कार्यकर्त्यांचे जाळे असणारा, महिला बचत गटांचे जाळे असणारा आणि विशेष म्हणजे हे सर्व हाताळण्यासाठी पैशासोबतच मसल पॉवर आवश्‍यक असल्याने असे उमेदवारच पक्षात ओढण्यासाठी चढाओढ सुरू आहे.
मनी आणि मसल पॉवरवाल्यांना पक्ष पाहिजेच असतो, मग पद कोणत्या पक्षातून मिळेल, कोणत्या पक्षात गेले तर त्याचा कसा फायदा होईल, हे गणित पाहूनच निर्णय कळविणार आहेत. राजकीय नेत्यांचे फोन अशी पॉवर असणाऱ्या उमेदवारांना जात आहेत. तुम्ही आमच्याकडूनच लढा, असा निरोप धाडला जात आहे. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर पुन्हा अशा जोडण्यांना ऊत येणार आहे.

आघाड्यांचे कारभारी सक्रिय

सक्षम आणि खर्चाची तयारी असणाऱ्या उमेदवारांचा शोध, त्यांच्याशी संपर्क, त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी पक्ष आणि आघाड्यांची स्वतंत्र यंत्रणा आहे. कार्यकर्त्यांना अशा काही चेहऱ्यांवर लक्ष ठेवायला सांगितले असून वेळ येताच त्यांना पक्ष आणि आघाडीत ओढण्यासाठी फिल्डिंग लावली आहेत. महत्त्वाच्या सर्वच पक्षांचे बँक ऑफिस त्यासाठी सक्षम केले जात आहेत. पक्ष आणि आघाड्यांचे कारभारी या मोहिमेत सक्रिय आहेत.

संपादन - स्नेहल कदम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT