कोल्हापूर महापालिका  sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : नगररचना विभागावर फोकस करा

नगररचना हा समाजसेवा करण्यासाठी नाही तर महापालिका उत्पन्न मिळवून देणारा विभाग आहे.

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : नगररचना हा समाजसेवा करण्यासाठी नाही तर महापालिका उत्पन्न मिळवून देणारा विभाग आहे. या विभागात पारदर्शक आणि जलदगतीने काम झाले पाहिजे. यासाठी नगररचना विभागावर फोकस करा, अशी सक्त सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिल्या. अग्निशमन यंत्रणेच्या टर्नटेबल लॅडरच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. शहरातील इमारतींना २३ मीटरची परवानगी दिली. त्यामुळे अग्निशमनकडे टर्नटेबल लॅडर असणे आवश्यक होते. कोल्हापूर ही राज्यातील तिसरी महापालिका आहे ज्यांच्याकडे टर्नटेबल लॅडर आहे. त्यामुळे २३ मीटर उंचीपर्यंत आग लागल्यास ती आटोक्यात आणता येईल. आज या लॅडरचे लोकार्पण झाले. सासने ग्राउंड येथील दिलीप देसाई क्रीडा संकुलमध्ये कार्यक्रम झाला. आमदार जयश्री जाधव, जयंत आसगावकर प्रमुख उपस्थित होते.

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘शहरातील विकासकामे गतीने झाली पाहिजेत. थेट पाईपलाईनचे काम गतीने सुरू असून, या दिवाळीला या पाण्याने अंघोळ होईल, अशी शक्यता आहे. महापालिकेची निवडणूक ऑक्टोबरमध्ये होईल. त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहावे’.प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे म्हणाल्या, ‘दोन वर्षे कोविडमध्ये गेल्याने विकासकामे रखडली होती. मात्र, आता प्रशासनाने गतीने याबाबत उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

क्रेडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर म्हणाले, ‘डीपी रोडच्या विकासावर भर द्यावा. ५४ मीटरची परवानगी ७० मीटरपर्यंत द्यावी.’ माजी उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख, आदिल फरास, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, अग्निशमनचे मुख्य अधिकारी रणजित चिले, दिलीप पोवार, मधुकर रामाणे, भूपाल शेटे, अर्जुन माने, अश्पाक आजरेकर, प्रकाश गवंडी, रियाज सुभेदार उपस्थित होते. प्रास्ताविक नगररचना विभागाचे सहायक संचालक रामचंद्र महाजन यांनी केले.

‘अग्निशमन’च्या जवानांना किमान वेतन मिळावे

पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘अग्निशमन यंत्रणेच्या जवानांनी महापुरात जीव धोक्यात घालून मोठे काम केले. त्यांना किमान वेतन मिळाले पाहिजे. प्रशासकांनी हा निर्णय घ्यावा आम्ही त्यांना लागेल ती मदत करू. ’

पालकमंत्री पाटील म्हणाले...

२०२१ मधील शंभर टक्के बाधित

महापूरग्रस्तांचा घरफाळा माफ करणार

सहा महिन्यांत गुंठेवारी नियमित करणार

हद्दवाढीसाठी क्रेडाईने ग्रामीण जनतेचा संभ्रम दूर करावा डीपी रोडची कामे सुरू करा. ऑक्टोबरमध्ये परीख पुलाला पर्यायी पूल उभारणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press : १४ मिनिटांत १२ मतदारांची नावे वगळणाऱ्या सूर्यकांतला राहुल गांधींनी थेट स्टेजवरच आणले...खुलासा ऐकून सगळेच अवाक्

हायड्रोजन बॉम्ब अजून बाकी, इलेक्शन कमिशनमधूनच मिळतेय मदत; राहुल गांधी काय म्हणाले?

Windows 10 : ऑक्टोबर महिन्यांपासून बंद होणार विंडोज 10 चा फ्री सपोर्ट; लाखो वापरकर्त्यांचा डेटा धोक्यात, आता काय करावं? जाणून घ्या

Fake Massege Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाची बनावट मेसेजद्वारे फसवणूक, अब्दुललाटच्या दोघांवर गुन्हा; का आहे नेमकं प्रकरण?

Baba Adhav : ...अन्यथा राज्यव्यापी जेल भरो आंदोलन, डॉ. बाबा आढाव; माथाडी कायद्यातील दुरुस्त्या मागे घेण्याची मागणी

SCROLL FOR NEXT