arrested  esakal
कोल्हापूर

Kolhapur News : वेश्‍या व्यवसायासाठी तरुणी पुरविणाऱ्यास अटक

कासारवाडी येथील एका हॉटेलमध्ये कारवाई

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कासारवाडी (ता. हातकणंगले) येथील एका हॉटेलमध्ये वेश्‍या व्यवसायासाठी तरुणी पुरविणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. संशयित हनुमंत दिलीप खर्जे (रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे.

अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. कासारवाडी (ता. हातकणंगले) येथील एका हॉटेलमध्ये आज दुपारी ही कारवाई झाली. शाहूपुरी पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल असल्याने पथकाने त्याचा ताबा शाहूपुरी पोलिसांकडे दिला

पोलिसांनी सांगितले की, जिल्ह्यात काही लॉज, मसाज सेंटरला वेश्या व्यवसायासाठी तरुणी पुरवल्या जात असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार शोध घेतला असता, राजेंद्रनगर येथील हनुमंत खर्जे हा त्याच्या रिक्षातून काही तरुणी पुरवत असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार त्याच्यावर कासारवाडी येथे आज दुपारी कारवाई केली. अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाच्या सहायय्क पोलिस निरीक्षक श्रद्धा आंबले-बरगे यांनी ही माहिती दिली.

दरम्यान, शिरोळ तालुक्यातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या महिलेसही पथकाने ताब्यात घेऊन, पीडित मुलीची सुटका केल्याचेही पथकाकडून सांगण्यात आले. एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा कुरुंदवाड पोलिस ठाण्यात दाखल होता.

त्यानुसार अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाने येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात एका महिलेस ताब्यात घेतले. नफिसा समीर दानवाडे (रा. गोकुळ चौक, इचलकरंजी) असे तिचे नाव आहे. पुढील कार्यवाहीसाठी तिचा ताबा कुरुंदवाड पोलिसांकडे देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT