kolhapur police read on women jugaad please 
कोल्हापूर

Big Breaking-कोल्हापुरात महिलांच्या आंदर-बाहर जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - आजपर्यंत पुरूषांचा जुगार अड्डा माहित होता पण आज टेंबलाई नाका परिसरातील झोपडपट्टीत चक्क महिलांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून जुगार खेळणाऱ्या पाच महिलांसह अड्डामालक महिला व दोन युवक अशा आठ जणांना अटक केली. या घटनेने या परिसरात खळबळ उडाली आहे. 
या छाप्यात रोख सहा हजार रूपयांसह दोन मोबाईल, जुगाराचे साहित्य असा 14 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहरात पहिल्यांदाच महिलांचा जुगार अड्डा उघडकीस आल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. 

या प्रकरणी अड्डा मालक शोभा संजय हेगडे (रा. झेंडा चौक, कागल), निलम विजय कांबळे (रा. मणेर मळा, उचगांव), वर्षा इकबाल लोंढे (वय 30), दिपाली आकाश लोंढे (वय 20, दोहीही रा. टाकाळा झोपडपट्टी), भिंगरी अविनाश सकट (वय 40, रा. राजेंद्रनगर झोपडपट्टी), सुरेखा राजू नरंदेकर (वय 37, टेंबलाई नाका), सुनील संभाजी घोडके (वय 38, रा. घोडके चाळ, टेंबलाई नाका), करीम मोहिद्दीन खान (वय 38, रा. ओमसाई पार्क, उचगांव) अशी अटक केलेल्यांची नांवे आहेत. 

टेंबलाई नाका परिसरातील झोपडपट्टीत महिलांचा आंदर-बाहर जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक नवनाथ घुगरे यांच्या नेतृत्त्वाखाली पथकाने या अड्ड्यावर छापा टाकून ही कारवाई केली. यापुर्वी दारू अड्डा, मटका अड्डा चालवणाऱ्या महिलांना अटक झाली आहे. पण महिलांच्या जुगार अड्ड्यावरील ही जिल्ह्यातील पहिलीच कारवाई आहे. 
 
संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS 2nd T20I Live: 4,6,4,0,6,W! मिचेल मार्शकडून कुलदीपचे खतरनाक स्वागत; तिलक वर्माच्या अफलातून झेलने ऑसी गार Video Viral

Latest Marathi News Live Update : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा हल्लाबोल : "विरोधकांची मतं नाही, मती चोरीला गेली आहे!"

रोज पोटावर मांडीवर इंजेक्शन, अभिनेत्रीने बाळ होण्यासाठी 'अशी' घेतली ट्रीटमेंट, म्हणाली...'मला बेशुद्ध होण्यासाठी...'

Breathing Exercises: फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी ‘ब्रीदिंग एक्सरसाईज’ का गरजेची? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कारणं

MPSC Exam Result : वडिलांच्या निधनानंतरच्या नैराश्‍यातून बाहेर पडून ‘तिने’ साधली ‘प्रगती’; प्रगती जगताप अनुसूचित जातीतून राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT