kolhapur police video record Communication block  
कोल्हापूर

Video -व्हिडिओ रेकॉर्डद्वारे पोलिसांकडून गांधीगिरी; प्रतिष्ठित समजणाऱ्यांना चपराक

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : आरोग्यासाठी आपण किती सतर्क आहोत हे दाखविणाऱ्या काही सुज्ञ व्यक्तींचा व्हिडिओ तयार करून पोलिसांनी गांधीगिरीने त्यांना चपराक दिली आहे. आपणास संचारबंदी आहे हे माहिती आहे का ? असा प्रश्न त्यांना करून त्यांचे नाव सुध्दा पोलिसांनी विचारले आहे. संचारबंदी असतानाही एकत्रित फिरणे, सायकलिंग करणे असे प्रकार आजही कोल्हापुरात सुरू आहेत. यांच्यावर कारवाई करण्यापेक्षा गांधीगिरीने त्यांचा व्हिडिओ करून पोलिसांनी तो व्हायरल केला आहे.

स्वतःच्या आरोग्याची काळजी असल्याचा दिखावा करीत काही शिक्षक थेट मेरी वेदर ग्राऊंडवर फिरताना दिसले आहेत. यामध्ये शिक्षक नेते दादा लाड आणि शिक्षक राजेश पाटील यांचाही समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्या समोर जाऊन व्हिडिओ सुरू केला आणि त्यांना त्यांचे नाव विचारले. यावेळी नेत्यांनी आपण अत्यावश्यक सेवेत असल्याचे ओळख पत्रही दाखविण्याचा प्रयत्न केला. यानंतर ते शिक्षक असल्याचेही सांगितले. पोलिसांनी याचे रेकॉर्डिंग केले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल केले आहे.

संचारबंदी असताना ही मंडळी घराबाहेर दिसत आहेत. आपल्या घरातील कुटुंबीयांपर्यंत कोरोना विषाणू पोचवण्याचे काम हे करीत आहेत अशी, ही टिप्पणी पोलिसांनी त्या व्हिडिओत केली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर आणि शैक्षणिक क्षेत्रासह इतर ठिकाणी चांगलंच गाजत आहे. पोलिसंनी सायकलिंग करणाऱ्यांचाही व्हिडिओ केला आहे. यावेळी पोलिसांनी सायकलिंग करणाऱ्यांना नावे विचारल्यानंतर निखिल अहुजा, संजय बहिरशेट, धवल पटेल, हर्षल पारेख, गौरव लड्डा अशी नावे असल्याचे त्यांनी सांगितले.  

विनंती करूनही काही प्रतिष्ठित , सुज्ञ नागरिक संचार बंदीचे पालन करत नसल्याचे दिसून येते. म्हणून व्हिडिओ रेकॉर्डिंग करून तो व्हायरल करण्याचे काम आम्ही सुरू केले आहे . किमान आता तरी सर्वांनी घरी बसा, असे पुन्हा पुन्हा आवाहन करीत आहोत.
- डॉ. अभिनव देशमुख : पोलिस अधीक्षक, कोल्हापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palamu Naxal Encounter : झारखंडमध्ये जंगलात लपून बसलेल्या नक्षलवाद्यांकडून बेछूट गोळीबार; दोन जवान शहीद, एक जखमी

Pune Municipal Corporation Election: हरकतींसाठी आज शेवटची संधी; पुणे महापालिकेच्या प्रभागरचनेवर दिवसभरात एक हजार सूचना

Mumbai News: 'गणपती दर्शनातून राजकीय समीकरणांची फेरमांडणी'; दर्शनात राजकीय संकेत, पालिका रणांगणासाठी शिंदे-भाजपाने पत्ते उघडले!

Latest Marathi News Updates : पुढील एक तासात अंधेरी, गोरेगावसह कांदिवली पट्ट्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा इशारा

दूध, पनीर, रोटी ते शैक्षणिक वस्तूंवर ZERO GST; औषधे, विमा पॉलिसीही जीएसटी मुक्त; वाचा यादी

SCROLL FOR NEXT