Hasan Mushrif and Dhananjay Mahadik Bullet Ride esakal
कोल्हापूर

Kolhapur Politics : पालकमंत्र्यांना मागे बसवून महाडिकांची 'बुलेट सवारी'; मुश्रीफ म्हणाले, 'मुन्ना'च्या पाठीशी मी..

वाहनांच्या चाव्या पोलिसांना देताच एका बुलेटवरून खासदार महाडिक यांनी फेरी मारली.

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर जिल्ह्यातून लोकसभेसाठी त्या दोघांनाच पुन्हा संधी दिली जाईल’, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

कोल्हापूर : ‘मी नेहमीच मुन्ना यांच्या पाठीशी राहणार आहे,’ अशी मिश्‍कील टिप्पणी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे केली. पोलिस वाहनांच्या हस्तांतर सोहळ्यात खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) हे बुलेटवर स्वार झाले. त्यांच्या पाठीमागे पालकमंत्री मुश्रीफ यांनी बसून मुख्यालयाच्या मैदानावर एक फेरी मारून सर्वांचे लक्ष वेधले. यानंतर एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही टिप्पणी केली.

पालकमंत्र्यांच्या हस्ते वाहन हस्तांतर सोहळ्याला खासदार म्हणून महाडिक यांनाही आमंत्रण होते. येथे वाहनांच्या चाव्या पोलिसांना देताच एका बुलेटवरून खासदार महाडिक यांनी फेरी मारली. त्यावेळी त्यांच्या मागे पालकमंत्री मुश्रीफ (Hasan Mushrif) बसले.

दरम्यान, या सोहळ्यानंतर काही वेळातच शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद झाली. पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘राधानगरी येथील पाणी एका प्रकल्पाला देऊ नये, यासाठी दोन शिष्टमंडळे भेटली आहेत. त्यांचाही विचार केला जाईल. कोणत्याही परिस्थितीत राधानगरी पाटगावातील पाण्‍याचा थेंबही दिला जाणार नाही. सिंधुदुर्गात प्रकल्प सुरू आहे, मात्र पाणी राधानगरी पाटगावातून नेणार असल्‍याची माहिती आता पुढे आली आहे. शिष्टमंडळांच्या गावांचा विचार करून पाणी दिले जाणार नाही.’

विद्यमान खासदारांनाच पुन्हा संधी

‘जिल्ह्यात संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे दोन विद्यमान खासदार आहेत. ते दोघेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून लोकसभेसाठी त्या दोघांनाच पुन्हा संधी दिली जाईल’, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

शहरातील प्रश्‍नांबाबत बैठक

‘शहरात पर्यटकांचा महापूर आहे. तरीही येथे नागरी सुविधा नाहीत. महिलांसाठी स्वतंत्र शौचालय नाही. शौचालयांची संख्या अपुरी असून काही पाडून टाकली आहेत. खड्डेही योग्य पद्धतीने भरलेले नाहीत, अशा तक्रारी पत्रकार परिषदेत झाल्यानंतर मुश्रीफ यांनी आढावा बैठक घेऊन हे प्रश्‍न निकाली काढू, असे सांगितले.

त्यांची पॅरेलेसिसची व्याख्या काय?

खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला पॅरेलेसिस झाल्याचे म्हटले आहे, त्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता मुश्रीफ म्हणाले, ‘आम्ही ज्या दिवसांपासून आहे, त्या दिवसापासून मोठ्या प्रमाणात निर्णय झाले आहेत. विकासकामे होत आहेत. कामाचा वेग वाढला आहे. आता तरीही पॅरालेसिस झाला आहे, असे कसे म्हणायचे. त्यांची पॅरेलेसिसची व्याख्या काय आहे, हे कसे कळायचे?’

मोदींच्या नेतृत्वाखाली महायुतीचाच विजय होईल

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीतसुद्धा पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली महायुतीचाच विजय होईल. अजून आचारसंहिता नाही तरीही सर्व्हे होतात. त्याला काहीच अर्थ नाही’, असेही मुश्रीफ यांनी पत्रकारांच्या एका प्रश्नावर उत्तर दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT