Dhananjay Mahadik vs Satej Patil esakal
कोल्हापूर

'मी महादेवराव महाडिकांच्या तालमीत तयार झालोय, त्यांना योग्यवेळी प्रत्युत्तर देऊ'; कोणी दिलाय सतेज पाटलांना इशारा?

काहींची ‘रस्सी जल गई लेकिन बल नही गया’ अशी अवस्था झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

आमदार सतेज पाटील यांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना खासदार महाडिक म्हणाले,‘आज चांगला दिवस आहे, त्यामुळे राजकारणावर मी काही बोलणार नाही.

कोल्हापूर : आज गोकुळ दूध संघ व राजाराम कारखान्याबाबत काही चर्चा सुरू आहेत, आजचा दिवस त्यावर बोलण्यासारखा नाही; पण काहींची ‘रस्सी जल गई लेकिन बल नही गया’ अशी अवस्था झाली आहे. त्यांना योग्यवेळी योग्य उत्तर देऊ, अशा शब्दांत खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्यावर त्यांचं नाव न घेता निशाणा साधला.

महाडिक यांच्या पुढाकाराने आयोजित धनंजय महाडिक युवाशक्तीच्या वतीने आयोजित दहीहंडी कार्यक्रमात ते बोलत होते. दसरा चौकात हा कार्यक्रम झाला. खासदार महाडिक म्हणाले, ‘तेरा वर्षांपूर्वीपासून कोल्हापुरातीलच नव्हे तर पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दहीहंडीचे आयोजन आम्ही करतो. आकर्षक व मोठे बक्षीस, सहभागी गोविंदा पथकांना दिले जाणारे उत्तेजनार्थ बक्षीस यामुळे ही स्पर्धा प्रसिद्ध झाली आहे.

पूर्वी जिल्ह्यात केवळ तीनच गोविंदा पथके होती, आज ही संख्या २४ वर पोहोचली आहे, याचे श्रेय धनंजय महाडिक युवाशक्तीला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्व सणांवर निर्बंध लावण्यात आले; पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या पुढाकाराने सर्वच सण, उत्सव खुले झाले आहेत. या खेळाला साहसी खेळाचा दर्जा देऊन त्यांना प्रोत्साहित करण्याचे काम महायुती सरकारने केले आहे.’

आज राजाराम कारखान्याचे १२७२ सभासद अपात्र झाले, यावरून आमदार सतेज पाटील यांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना खासदार महाडिक म्हणाले,‘आज चांगला दिवस आहे, त्यामुळे राजकारणावर मी काही बोलणार नाही. आम्ही माजी आमदार महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik) यांच्या तालमीत तयार झालो आहोत. गोकुळ व राजारामवरून जे काही सुरू आहे त्यातून काहींची अवस्था ‘रस्सी जल गयी, लेकिन बल नही गया’ अशी झाली आहे. त्यांना योग्यवेळी योग्य प्रत्युत्तर देऊ.’

नेत्यांची मांदियाळी

या दहीहंडीच्या निमित्ताने सर्वपक्षीयांची मांदियाळी व्यासपीठावर पाहायला मिळाली. त्यात माजी आमदार महादेवराव महाडिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने, माजी आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, भाजपचे माजी आमदार अमल महाडिक, शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, प्रा. जयंत पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राजवर्धन निंबाळकर, राहुल देसाई.

तसेच राहुल चिकोडे, अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे-पाटील, महेश जाधव, राहुल चिकोडे, अशोक माने, माजी नगरसेवक सत्यजीत उर्फ नाना कदम, संग्रामसिंह कुपेकर, सुहास लटोरे, अरूंधती महाडिक, स्वरुप महाडिक, विश्‍वराज महाडिक, कृष्णराज महाडिक, पृथ्वीराज महाडिक, कर्नाटकच्या भाजप आमदार शशिकला जोल्ले, त्यांचे पती खासदार आण्णासाहेब जोल्ले अशा दिग्गजांनी व्यासपीठावर हजेरी लावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan 21st Installment : मोठी बातमी! पंतप्रधान मोदींनी किसान सन्मान योजनेचा २१वा हप्ता केला जारी

U19 World Cup 2026 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर! भारताचे सामने कुठे आणि कधी होणार? जाणून घ्या

Anmol Bishnoi: अखेर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलला भारतात आणलं; NIA कडून अटक, कसा बनला भारतातील 'मोस्ट वॉन्टेड'?

Mumbai Crime: पाणी भरण्यावरून वाद; महिलेचं डोकं फिरलं; घरातून मॉस्किटो किलर स्प्रे आणलं अन्...; व्यक्तीसोबत नको ते घडलं

LinkedIn Workforce Survey: एआयमुळे बदलतंय मुंबईचं बिझनेस लँडस्केप, लिंक्डइनच्या सर्व्हेत समोर आले धक्कादायक आकडे

SCROLL FOR NEXT