Kolhapur administration alert to flood affected 37000 families
Kolhapur administration alert to flood affected 37000 families 
कोल्हापूर

Kolhapur Rain Alert : स्वयंमाहिती प्रणालीतून कळणार आपत्तीची अपडेट, पूरपरिस्थितीची माहिती मोबाईल नंबरद्वारे

सकाळ वृत्तसेवा

Kolhapur Flood Update : जिल्ह्यातील आपत्तीची व पूरपरिस्थितीची माहिती मोबाईल नंबरद्वारे मिळावी, यासाठी ‘स्वयंमाहिती प्रणाली’ आजपासून कार्यान्वित केली आहे. ९२०९२६९९९५ या नंबरवर पावसाची सर्व माहिती दिली जाणार आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी याबद्दलची माहिती आज दिली.

जिल्ह्यात पाच दिवसांपासून होणाऱ्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, पुरासह धरणांची, पावसाची, एखाद्या आपत्तीची माहिती एकाच मोबाईल नंबरवरून दिली जावी, यासाठी ही प्रणाली सुरू केली आहे.

लोकांनी ९२०९२६९९९५ हा मोबाईल क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करावा. व्हॉट्‌स-ॲपवरून एखादा मॅसेज पाठवावा. त्यानंतर अनुक्रमे जिल्ह्यातील पर्जन्यमान, धरण व पाणी पातळी अहवाल, पंचगंगा पाणी पातळी, महत्त्वाचे संदेश, आपत्कालीन संपर्क क्रमांक, रस्ते व वाहतूक

ठप्प असणारी किंवा सुरू असणारी माहिती मिळणार आहे. आज याची सुरुवात झाली आहे. अजून यामध्ये अपडेट केले जात आहेत. उद्यापासून लोकांसाठी उपयुक्त असणारी माहिती मिळत जाणार आहे.

कोल्हापूर पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्व नागरिकांना सूचना

पुराचे पाणी आपल्या भागात वाढत असल्यास दुर्लक्ष करू नका.अतीआत्मविश्वास न बाळगता आपल्या कुटुंबीयांचे तसेच जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करून घ्यावे. भूस्खलन होणाऱ्या भागात तसेच नदीकाठी राहणाऱ्या, नागरिकांनी सतर्क रहावे. काही भागात पुराचे पाणी रस्त्यावर पाणी आले असल्यामुळे रस्ते बंद आहेत अशा रस्त्यावरून वाहतूक होणार नाही याची नागरिकांनी काळजी घ्यावी.पुराच्या पाण्यात वाहन चालवून आपला जीव धोक्यात घालू नका.

गावातील कार्यकर्ते तसेच तरुण मंडळे यांनी नागरिकांकरिता प्रबोधनात्मक डिजीटल बॅनर्स व सूचना फलक लावावेत. प्रशासनाने दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.

तातडीच्या मदती करता संपर्क - 112 व 0231-2662333

अजय सिंदकर (पोलीस निरीक्षक शाहूपुरी पोलीस ठाणे)

मोबा : 8369096182

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

IND vs BAN Playing 11 : सराव सामन्यातच ठरणार सलामी जोडी; बुमराहचा पार्टनर कोण असणार?

Virat Kohli : सेमी फायनल, फायनल आली की विराट.... मांजरेकर म्हणतात किंग कोहली टीम इंडियासाठी चिंतेचा विषय

Latest Marathi Live News Update: जीडीपीची आकडेवारी पाहून मोदींनी मानले कष्टकऱ्यांचे आभार

SCROLL FOR NEXT