kolhapur esakal
कोल्हापूर

Kolhapur Rain Flood Update : तावडे हॉटेल परिसरातील नागरिकांना हलवले, पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली

विक्रेत्यांच्या ३६ झोपड्या; दीडशे जणांचे पेठवडगाव, कागल वसाहतीत स्थलांतर

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : शहरात पावसाचा जोर कमी असला तरी पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडल्याने महापालिका प्रशासनाने आज तावडे हॉटेल येथील विक्रेत्यांच्या ३६ झोपड्यांमधील १५० हून अधिक नागरिकांना हलवले.

पुराचे पाणी गायकवाड वाड्याच्या पुढे आल्याने शिवाजी पूल ते गंगावेश रस्ता प्रशासनाने बंद केला. आज सकाळपासून शहरात पावसाचा जोर कमी होता. पण, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे तावडे हॉटेल परिसरातील कमानीजवळ पाणी वाढले.

त्या परिसरात विविध वस्तूंची विक्री करणाऱ्या फिरस्त्यांच्या झोपड्या आहेत. इशारा पातळीवर पाणी गेल्यानंतर त्या परिसरात पुराचे पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कालपासून अग्निशमन दलाचे जवान तेथील झोपडपट्टीधारकांना हलवण्याच्या प्रयत्नात होते.

आज सकाळपासून त्या सर्वांना स्थलांतरित होण्याची सूचना केली. त्यानंतर वाहने आणून त्यात साहित्य भरून घेऊन जाऊ लागले. महापालिकेच्या यंत्रणेनेही त्यांना काही वाहने दिली. ३६ हून अधिक झोपड्यांमध्ये असलेले १५० हून अधिक नागरिक पेठवडगाव व कागल परिसरातील त्यांच्या वसाहतीमध्ये स्थलांतरित झाले.

या वेळी अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, उपशहर अभियंता रमेश कांबळे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे तसेच अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

शहरात १८ ठिकाणी पुराचे पाणी येते. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ व केशव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले जात असून, चार विभागीय कार्यालयाअंतर्गत नागरिकांसाठीची स्थलांतरितांची ठिकाणे तयार ठेवली आहेत.

उपायुक्त शिल्पा दरेकर, साधना पाटील, शहर अभियंता हर्षजित घाटगे यांनी विभागीय कार्यालयांच्या क्षेत्रातील अशा ठिकाणांची पाहणी केली. स्थलांतरित ठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या भोजनाची, चहा-नाष्ट्याची व्यवस्था केली आहे. स्वतंत्र अधिकारी, कर्मचारी नेमले आहेत. वैद्यकीय यंत्रणा सज्ज असून औषध साठा केला आहे. तसेच वैद्यकीय तपासणीसाठी स्वतंत्र वैद्यकीय पथके तयार केली आहेत.

वर्षा पर्यटनासाठी गर्दी

सुटी असल्याने पंचगंगा नदीच्या पुराचे पाणी तसेच रंकाळा तलावावर वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. शिवाजी पुलाजवळ पोलिस उत्साही नागरिकांना सूचना देत होते. पावसाने सायंकाळी उघडीप दिली असल्याने रंकाळ्यावर भाजलेली कणसे खात सेल्फी घेताना नागरिक दिसत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain Update: पाऊस थांबायचं नाव नाही! पुण्यात दरड कोसळली, नाशिकला ढगफुटीचा इशारा अन्...; आज कुठे काय घडलं? वाचा संपूर्ण अपडेट

IND vs ENG, 3rd T20I : भारताविरुद्ध आघाडी घेण्यासाठी इंग्लंडचा संघ सज्ज! सामन्यासाठी यजमानांची Playing XI जाहीर

11th Special Round Extended: अतिवृष्टीचा फटका: अकरावी प्रवेशाच्या पहिल्या विशेष फेरीची मुदत बुधवारीपर्यंत वाढ, सुधारित वेळापत्रक जाहीर

Pune Heavy Rain Alert: कर्जत घाटात दरडींचा तडाखा; मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक ठप्प, १६ गाड्या रद्द

U19 IND vs SL : ९ चौकार अन् १ षटकार... द्रविडच्या लेकाची जोरदार फटकेबाजी; पण श्रीलंकेने सामना जिंकत केली ODI मालिकेत बरोबरी

SCROLL FOR NEXT