Kolhapur Band esakal
कोल्हापूर

Kolhapur Riots : कोल्हापुरात इंटरनेट सेवा अद्याप बंद; जाणून घ्या कधी होणार सुरु

इंटरनेट बंद असल्यामुळे अनेकांसाठी मनोरंजनाचे साधन बंद झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापुरात आक्षेपार्ह (Kolhapur Riots) स्टेटस् वरून दंगल उसळली होती. त्यानंतर प्रशासनाकडून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. मात्र, अद्यापही इंटरनेट सेवा (Internet service) सुरु नसल्याने तरुण वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.

कायदा व सुव्यवस्थेसाठी बुधवारी (ता. ७) सायंकाळी 5 वाजल्यापासून इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनानं दिले होते. गुरुवारी (ता. 8) रात्री 12 पर्यंत इंटरने बंदचे आदेश दिले होते. मात्र, अद्यापदेखील इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आलेली नाहीये.

त्यामुळं कोल्हापूरमध्ये इंटरनेट सेवा कधी सुरू होणार, याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. दरम्यान, अद्ययावत माहितीनुसार, आज शुक्रवारी (ता. 9) सकाळी 10 नंतर इंटरनेट सेवा पूर्ववत होणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली. दरम्यान, इंटरनेट बंद असल्यामुळं डिजिटल व्यवहारावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक डिजिटल व्यवहार ठप्प झाले आहेत.

काेल्हापूर शहर आणि परिसरात शांतता निर्माण करण्यासाठी पाेलिसांची जादा कुमक मागवण्यात आली आहे. याबराेबरच गेले दाेन दिवस शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्याचे निर्देश इंटरनेट कंपन्यांना देण्यात आले. त्यामुळं काेल्हापूर आणि ग्रामीण भागातील इंटरनेट सेवेवर बंधन आली. सर्वच कंपन्यांनी सुविधा बंद ठेवली. ती अद्याप सुरु झाली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT