kolhapur sakal
कोल्हापूर

Kolhapur News : ग्वाल्हेरमध्ये अवतरले ‘कोल्हापूर स्कूल’...

राष्ट्रीय रंगोत्सवात ठसा; कलापूरच्या सोळा चित्रकारांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : ग्वाल्हेर येथे झालेल्या राष्ट्रीय रंगोत्सवात येथील सोळा चित्रकारांनी चित्रकलेतील कोल्हापूर स्कूलचा अनुभव दिला. प्रा. वासंती जोशी कला सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे या रंगोत्सवाचे आयोजन झाले.

चित्रकार राजेंद्र हंकारे, शिवाजी मस्के, प्रशांत जाधव, विजय टिपुगडे, नागेश हंकारे, सूर्यकांत निंबाळकर, अरुण सुतार, संपत नायकवडी, अभिजित कांबळे, मनोज सुतार, बबन माने, श्रीरंग मोरे, सुनील पंडित, रमण लोहार, अनिल अहिरे, विजय उपाध्ये आदी चित्रकारांनी चित्राविष्कार सजवला. त्यातून निसर्गचित्रांबरोबरच ऐतिहासिक वास्तूंच्या कलाकृतीही साकारल्या.

चित्रकार राजेंद्र हंकारे यांनी पंचवीस फूट कागदावर कॅलीग्राफी कलाकृती साकारली. एकूणच या रंगोत्सव स्थानिक कलाशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक कार्यशाळाच ठरला. या वेळी जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे प्रा. डॉ. गणेश तरतरे, आग्रा फाईन आर्ट कॉलेजचे माजी प्राचार्य सरोज भार्गव, प्रा. बळवंतसिंह भदोरिया, पुनीत जोशी, मैत्रेयी शुक्ल आदी उपस्थित होते. प्राचार्य अजय दळवी, कोल्हापूर आर्ट फाउंडेशनचे समन्वयक प्रशांत जाधव, धीरज सुतार यांनी विशेष परिश्रम घेतले. दरम्यान, प्रमोदकुमार जोशी यांनी वासंती जोशी यांच्या कोल्हापूरविषयीच्या आठवणी सांगितल्या.

बैजातालमध्ये सजला चित्राविष्कार

प्रतिष्ठानतर्फे प्रत्यक्ष निसर्गचित्र प्रात्यक्षिकाचे आयोजन बैजाताल येथे झाले. ग्वाल्हेरमधील बैजाताल हे उत्तर मराठा साम्राज्याच्या पाऊलखुणा जपणारे ऐतिहासिक ठिकाण आहे. तरंगता रंगमंच म्हणूनही हे ठिकाण प्रसिद्ध आहे. ग्वाल्हेरचे जिल्हाधिकारी अक्षयकुमार सिंग यांनी रंगोत्सवाला भेट देऊन चित्रकलेतील कोल्हापूर स्कूलची माहिती घेतली. प्रत्येक वर्षी अशा पद्धतीचा उपक्रम घेतला जाईल, अशी ग्वाही या वेळी जिल्हाधिकारी अक्षयकुमार सिंग यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaghcha Raja Look: लालबागचा राजा २०२५ चा पहिला लूक समोर, प्रथम दर्शनातून दिसली पहिली झलक, पाहा व्हिडिओ

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

AUS vs SA, ODI: दक्षिण आफ्रिकेचा वनडेतील सर्वात मोठा पराभव, तरी जिंकली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका; पाहा काय झाले रेकॉर्ड

Latest Marathi News Updates : रस्त्याअभावी रखडली अंत्ययात्रा, पुरोगामी महाराष्ट्रात अंत्ययात्रेसाठी ट्रॅक्टरचा आधार

Nagpur Fraud;'बेटिंग ॲप’द्वारे किराणा व्यापाऱ्याची २६ लाखांची फसवणूक; सायबर पोलिसांकडून चौघांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT