kolhapur shiv sena protest 
कोल्हापूर

शिवसेनेने ब्रम्हपुरीवरील काम बंद पाडले; संतप्त महिलांनी ठोकले टाळे 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - ब्रम्हपुरी येथील हॉली इव्हेंजलिस्ट चर्चच्या मालकीच्या पॅरिश हॉल येथे सुरू असलेले बेकायदा बांधकाम शिवसेनेने आज बंद पाडले. संबंधित ट्रस्टशी संबध नसणाऱ्या व्यक्तीकडून बांधकाम सुरु असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. संबधित ट्रस्टच्या स्थानिक व्यवस्थापनाने आणि स्थानिक ख्रिश्‍चन समाज बांधवांनी वेळोवेळी प्रशासनाकडे दाद मागितली होती. 

स्थानिकांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची भेट घेवून न्याय देण्याची विनंती केली. त्यानुसार उत्तरचे शहरप्रमूख रविकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. संतप्त झालेल्या स्थानिक महिलांनी बेकायदेशीर काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या कार्यालयास टाळे ठोकले. 

यावेळी इंगवले म्हणाले, हॉली इव्हेंजलिस्ट चर्च व पॅरिश हॉल असून या चर्च व हॉलचा वापर धार्मिक व सामाजिक कार्याकरिता नित्यनियमाने केला जातो. या मिळकतीमधील पॅरिश हॉल येथे ट्रस्टशी काही संबध नसणाऱ्या व्यक्तीकडून दुरुस्तीचे काम सुरु आहे. याबाबत संबधित ट्रस्टच्या स्थानिक व्यवस्थापनाने जिल्हा पोलिस प्रशासनासह लक्ष्मीपुरी पोलिसात तक्रार दिली. याविरोधात दाखल तक्रारी बाबत अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा प्रश्न शिवसेना स्टाईलने सोडविला जाईल. 

यावेळी बेकायदेशीर काम करणाऱ्या ठेकेदारास कागदपत्रे दाखविण्याच्या सूचना केल्या. परंतु, त्यांच्याकडे बांधकाम परवानगीची कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नव्हती. महिलांनी आक्रमक होऊन कंत्राटदारास काम बंद करण्यास भाग पाडले. 

यावेळी सुशील भांदिगरे, शाखाप्रमुख कपिल नाळे, सचिन क्षीरसागर, कल्पेश नाळे, राजू कुंडले, बबन शिंदे, शिला चिंचलीकर, अबिगेल भोसले, रिबेका महाजन, अर्चना खोडवे, वैशाली भोसले, प्राची वायदंडे, शकिला लोखंडे, अरुण सावंत, संदीप आवळे, प्रफुल्ल महाजन, महेश भालेराव, संजय भोसले, संजय आवळे, विनोद लोखंडे आदी आंदोलनात सहभागी झाले. 

 संपादन - धनाजी सुर्वे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Accident: चांदिवलीत अपघाताचा थरार! मद्यधुंद महिलेनं चौघांना उडवलं, भरधाव वेगात कार नेत २ दुचाकींना धडक दिली अन्...

'अमेरिकेत तिला कोणीही ओळखत नव्हतं' माधुरीबद्दल बोलताना डॉ. नेने म्हणाले... 'तिच्यामुळेच तुम्ही सगळे माझी मुलाखत घेतात'

IND vs NZ T20I: भारतीय संघाने विश्वविक्रम रचला! आता तिसरा सामना कधी, कुठे Live पाहता येणार? जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स

Sugarcane Transport Protest : राजू शेट्टी आक्रमक! मिरज -सोलापूर महामार्गावर ऊस वाहतूक करणारी ७८ वाहने स्वाभिमानीने अडवली, सौरभ शेट्टींसह कार्यकर्त्यांचा रात्रभर महामार्गावर ठिय्या

Latest Marathi News Update : अमरावती जिल्हा बँक निवडणुकीच्या हालचालींना वेग, ३१ ऑक्टोबरपूर्वी कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT