In Kolhapur some shops are closed and some are open 
कोल्हापूर

संभ्रमावस्था : कोल्हापूरात काही दुकाने बंद आणि काही दुकाने सुरू..

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : चाळीस दिवसाच्या कडक संचार बंदीनंतर आजपासून या संचार बंदी मध्ये शीतीलता निर्माण केली आहे. तरीदेखील काही दुकाने बंद आणि काही दुकाने सुरू असे चित्र शहरात निर्माण झाले आहे. व्यापारी संकुले अथवा व्यापारी पेठांमध्ये एकाच वेळेस पाचपेक्षा अधिक दुकाने उघडता येणार नाहीत अशी जाचक आठ घातल्याचा फटका व्यापाऱ्यांना बसला आहे. त्यामुळे चाळीस दिवसाच्या संचारबंदी नंतर आज देखील अनेक दुकाने बंद राहिली.

शहरातील चर्मकार लाईन, शिवाजी रोड, बिंदू चौक, लक्ष्मीपुरी, व्यापारी पेठ, शाहूपुरी,  येथील अनेक दुकाने बंदच राहिली. दुपारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासोबत व्यापाऱ्यांची बैठक झाल्यानंतर दुकाने सुरू ठेवण्याबाबत  निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान मद्य विक्रीच्या दुकाना बाबतही संभ्रमावस्था होती. मद्य विक्रीच्या दुकानासमोर नागरिक दुकाने केव्हा उघडणार याच्या प्रतीक्षेत रांगा लावून उभे होते परंतु बारा वाजले तरी दुकाने उघडली नसल्याने याविषयी काहीकाळ संभ्रमावस्था निर्माण  झाली.


 शहरातील सलून दुकाने मात्र सुरू झाली आहेत. हार्डवेअर, पेंटिंग ,कलर  दुकाने सुरू आहेत. शहरात दुचाकीस्वाराने गर्दी केली आहे त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Volvo Bus: एसटीचा प्रवास आता ‘व्होल्वो’मय! २०० एसी बस ताफ्यात येणार; शयनयान बससह मोबाइलवरून तिकीट बुकिंग

Devgad Fishermen Crisis : जिल्ह्यात मच्छीमारांवरही मंदीचे सावट उलाढालीची चिंता; मासळी घटल्याने इंधन खर्च पाण्यात

Madhya Pradesh: ७,४०० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत स्कूटी; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप

Marathi News Live Updates : दिल्ली उच्च न्यायालयात सात न्यायिक अधिकाऱ्यांची न्यायाधीशपदी नियुक्ती; मुख्य न्यायाधीशांसमोर शपथ

Jharkhand Plans ₹900 Crore Ayush Hospital: केरळपेक्षा स्वस्त अन् सर्वसामान्यांना परवडणारे आयुष मॉडेल; ९०० कोटींच्या हॉस्पिटलची घोषणा

SCROLL FOR NEXT