kolhapur soon Abhir Gokhale first in country basketball handling 
कोल्हापूर

कोल्हापूरच्या अभीरची बाजी ; देशात पटकविला पहिला नंबर 

सुयोग घाटगे

आर.के.नगर : कोल्हापूरचा अभिर गोखलेने संपूर्ण देशात बास्केटबॉल हॅंण्डलींगमध्ये सर्वात वेगवान ठरत बास्केटबॉल हॅण्डलिंग स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा 5 ऑक्‍टोबर ते5 डिसेंबर या तीन महिन्यांचा कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने झाली. अभिर हा विबग्योर हाय इंटरनेशनल स्कूलचा विध्यार्थी असून जिल्हा बास्केटबॉल संघटनेचा खेळाडू आहे. 

अखिल भारतीय वेगवान बास्केटबॉल ड्रिबलर ही स्पर्धा 5 ऑक्‍टोंबर रोजी सुरु झाली. यामध्ये संपूर्ण देशभरातून 700 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यात अभिर विक्रांत गोखले याने बाजी मारली.

या स्पर्धेची अंतिम फेरी 5 डिसेंबर रोजी घेण्यात आली. यामध्ये अभिरने देशामध्ये "फास्टेस्ट बॉल हॅण्डलर ऑफ इंडिया" हा किताब पटकावला. या स्पर्धेमध्ये 10 वर्ष वयोगट पासून वरिष्ठ वयोगटापर्यंत सहभाग घेतला होता. या संपूर्ण गटामध्ये अभिरने 36 सेकंदमध्ये 3 ड्रिल्स ज्यामध्ये ड्रिबलिंगचे विविध प्रकार सामिल होते. त्याच्या या यशाबद्दल पालकमंत्री सतेज पाटील यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. अभिरला प्रशिक्षक संदिप खोत यांनी प्रशिक्षण दिले आहे. गेल्या वर्षी अभिर राष्ट्रीय स्पर्धेमध्येही सहभागी झाला होता. अभिरला त्याचे वडील विक्रांत गोखले तसेच कोल्हापूर जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे सेक्रेटरी डॉ. शरद बनसोडे, नितीन दळवाई, विनायक साळोखे, अमित दलाल , तेजस्विनी महाडिक, निलेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. 

 
वयाच्या 6 वर्षांपासून बास्केटबॉल खेळत आहे. ही स्पर्धा अधिक आव्हानात्मक होती तसेच अनेक स्पर्धक या मध्ये सहभागी झाले होते. या स्पर्धेतील विजयाने आनंदित आहे यातून अनेक नवीन गोष्टी शिकण्यास मिळाल्या. 
-अभीर गोखले, बास्केटबॉल खेळाडू 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

नारकरांच्या घरी झाली सत्यनारायण पूजा; ऐश्वर्या यांनी स्वतः बनवला प्रसादाचा शिरा, कशी केली तयारी? दाखवला खास व्हिडिओ

Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होणार महादेव पार्वतीची विशेष कृपा; धनलाभाचे संकेत

Marathi News Live Updates : महाकाळा परिसरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको

Kharge Rally Controversy : मल्लिकार्जुन खर्गेंच्या रॅलीनंतर 'शुद्धीकरण' वाद पेटला! राज्यभरातून 80 तक्रारींनंतर पोलिसांचं मोठं पाऊल, काय आहे नेमकं प्रकरण?

SCROLL FOR NEXT