ST Bus News
ST Bus News esakal
कोल्हापूर

Kolhapur : ST चे चाक आले ट्रॅकवर

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोरोनाकाळात तसेच एसटी विलीनीकरण संपाच्या काळात एसटी महामंडळाची घसरलेली प्रवासी संख्या तसेच घसरलेला महसूल पुन्हा वाढू लागला आहे. एसटीने नव्या गाड्या कंत्राटी तत्त्वावर घेतल्यानंतर दिवसाकाठी ५० लाखाने प्रवासी वाहतूक होत आहे, तर सरासरी २२ कोटी प्रतिदिन महसूल मिळत आहे. कोरोनापूर्वी दिवसाला ६६ लाख प्रवाशांची वाहतूक, तर २६ कोटी रुपये महसूल मिळत होता. त्याच प्रवासी संख्येत व महसुलात मध्यंतरी निम्म्याने घट झाली होती.

सर्वच वर्गातील प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची खात्री देणारे एसटी महामंडळ गेल्या काही वर्षात तोट्याच्या गर्तेत सापडले आहे. यात कोरोनाकाळात जवळपास दोन वर्षे रोजची प्रवासी वाहतूक खंडित झाली. त्यानंतर प्रवासी सेवा सुरू झाली.

जेमतेम चार-सहा महिने होताच विलीनीकरण मागणीच्या संप सुरू झाल्याने सहा महिने व प्रवासी वाहतूक ठप्प झाली. या काळात एसटीचा प्रवासी वर्ग दुरावला. त्या संपानंतर प्रवासी सेवा पुन्हा सुरू झाली. यात प्रतिदिन जेमतेम ३५ लाख प्रवासी सरासरी १२ कोटींचा रुपयांचा महसूल एसटीला मिळत होता.

याच संप काळात कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला. कर्मचाऱ्यांना अभूतपूर्व वेतन वाढ झाली. एसटीच्या अार्थिक ताण वाढला. मिळणारा महसूल कमी झाला. यात राज्यभरात टोल कर तसेच वाढता इंधन खर्च भागविणेही मुश्कील होते.

राज्यशासनाने दर महिन्याच्या सात तारखेला वेतन देण्याची हमी घेतली. सेवा सुरू झाली. याच पाठोपाठ एसटी महामंडळाने राज्यभरात ५०० वर गाड्या खासगी कंपन्यांकडून घेतल्या आहेत. दिवाळी सणापासून या गाड्याही सेवेत आल्या. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांत एसटी प्रवासी संख्येत व पर्यायने महसुलात वाढ झाली आहे.

प्रवासी व महसूल वाढीचा आलेख असा

महिना प्रवासी संख्या प्रवासी महसूल

एप्रिल १९ लाख ११ कोटी

मे ३३ लाख १८ कोटी

जुलै ३७ लाख १७ कोटी

आॅगस्ट ४३ लाख १९ कोटी

सप्टेंबर ५१ लाख २० कोटी

आक्टोबर ४५ लाख २१ कोटी

नोव्हेंबर ५२ लाख २३ कोटी

डिसेंबर ५० लाख २२ कोटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market: लोकसभा निवडणुकीत मोदींना 270 पेक्षा कमी जागा मिळाल्यास शेअर बाजार कोसळणार? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Viral video: काय सांगता! आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची जीप थेट हॉस्पिटलमध्ये; काय होता त्याचा गुन्हा?

Bigg Boss OTT 3: मराठीनंतर हिंदी बिग बॉसमध्येही होणार मोठा बदल? सलमानच्या जागी 'हा' अभिनेता करणार सूत्रसंचालन?

Latest Marathi News Update: सीएनजी गॅस गळतीमुळे कराड मलकापूर मार्गावर वाहतूक खोळंबली

Virat Kohli : 'क्षणभर असे वाटत होते की...' RCBच्या पराभवानंतर विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT