Kolhapur tourism : स्काय सिटी... पर्यटकांची गर्दी मोठी sakal media
कोल्हापूर

Kolhapur tourism : स्काय सिटी... पर्यटकांची गर्दी मोठी

गगनबावड्यातील हॉटेल व्यावसायिक, दुकानदारांना ‘अच्छे दिन’

सकाळ वृत्तसेवा

गगनबावडा : निसर्गाचा चमत्कार, इतिहासाचा साक्षीदार, आध्यात्मिक पिठाचा वारसदार असणारे, प्रति महाबळेश्वर म्हणून संबोधले जाणारे गाव म्हणजे गगनबावडा. अर्थातच, स्काय सिटी! कोरोना काळात ठप्प झालेले पर्यटन आता मुक्त झाले. गगनबावडा परिसर गर्दीने फुलला आहे.

सध्या परिसरात नागराज मंजुळे यांच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरू असल्याने निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेल्या गगनबावड्यातील हॉटेल व्यवसायिक, टपरीवाले, दुकानदार, फेरीवाले यांना सध्या ''अच्छे दिन'' आले आहेत.

जैवविविधता, अनेक प्रकारची फुलपाखरे, झाडे, वेलींनी नटलेल्या ऐतिहासिक गगनगडावर रोज सातशे ते आठशे पर्यटक रोज भेट देत आहेत. शासनाने परवानगी दिल्यास दोन वर्षे बंद असलेला दत्तजयंती उत्सव भक्त व पर्यटक यांना पर्वणी आहे. येथे व्यापारी उलाढाल २५ लाखांच्या आसपास असते, असे विश्वस्त रमेश माने यांनी सांगितले.

सध्या पर्यटकांना राहण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची सुविधा व इतर हॉटेल्सही आहेत. ती शाकाहारी, मांसाहारी, मत्स्याहारी स्वादासाठी पर्यटकांच्या जिभेचे चोचले पुरवत स्वागतासाठी उभी आहेत.

ठिकाणे अशी :

ऐतिहासिक गगनगडाशिवाय करूळ-भुईबावडा घाट, सांगशी येथील पाचव्या शतकातील चालुक्यकालीन शिलालेख, पळसंबे येथील पांडवकालीन गुंफा, कुंभी, वेसरफ व कोदे येथील जलाशय आदी अनेक नयनरम्य ठिकाणे पर्यटकांना खुणावतात.

"महाबळेश्वरचे आता शहरीकरण झाले आहे. मात्र, गगनबावड्याचे हवामान व रमणीय निसर्ग पाहून पुणे, मुंबईच्या पर्यटकांना गगनबावडा हवाहवासा वाटतो. कोरोना काळात खूप त्रास झाला. पण, आता ‘अच्छे दिन’ आले आहेत."

- जगन्नाथ शेट्टी, व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ, गगनबावडा

"गगनबावडा चौकात चहाची गाडी आहे. बँकेचे कर्ज काढलेले असून, कोरोना काळात पर्यटन बंद असल्याने बँकेचा कर्जाचा हप्ता भरताना दमछाक झाली. रोजीरोटी चालविणे अवघड झाले. सध्या बरे दिवस आले आहेत. निदान कर्जाचा हप्ता तरी भरता येईल."

- आशिम पाटणकर, चहा टपरी व्यावसायिक

निसर्गाची मुक्त हस्ते उधळण

  • रोज ७००-८०० पर्यटकांची भेट

  • उलाढाल २५ लाखांच्या आसपास

  • नागराज मंजुळेंच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू

- तुकाराम पडवळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates : मुलुंड येथील क्रीडा संकुलन झालेल्या भ्रष्टाचाराबाबत महाविकास आघाडीचं आंदोलन

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

८ चेंडूंत ६ विकेट्स.. पाच त्रिफळाचीत ! Kishor Kumar Sadhak ने इंग्लंडमध्ये सलग दोन षटकांत घेतल्या दोन Hat-Tricks

Parenting tips: पेराल ते उगवेल, आई वडिलांकडून अशा प्रकारे सवयी शिकतात मुलं

SCROLL FOR NEXT