Kolhapur will get gas through the pipeline throughout the year 
कोल्हापूर

कोल्हापूरात वर्षभरात पाईपलाईनने मिळणार गॅस 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : स्वयंपाक घरात गॅस पाईपने मिळणार ही दोन-तीन वर्षापासूनची चर्चा आता प्रत्यक्षात येणार आहे. शिरोलीपासून सुरू झालेली गॅसपाईप लाईनचे काम सरनोबतवाडीतून शहराच्या इतर भागात येत आहे. कदमवाडीमार्गे हे काम शहरात येत आहे. या वर्षाभरात महिलांना स्वयंपाक घरात गॅस थेट पाईपलाईनने मिळणार आहे. ते ही केवळ 22 रुपये पन्नास पैसे किलोने हा गॅस मिळणार आहे. 
शिवाजी विद्यापीठापासून सरनोबतवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सध्या एकाबाजूला गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू झाले आहे. अत्यल्पकाळात त्यांनी गॅस पाईपलाईन टाकण्याचे जास्तीत जास्त अंतर कापले आहे. सध्या हे काम सुरू असल्यामुळे आणि उजळाईवाडी परिसरातील रस्ता बंद असल्यामुळे या रस्त्याला वाहतूक कोंडी होती. मात्र दोन दिवसांत गॅस पाईपलाईनसाठी खोदाई केलेला रस्ता बुजवल्यामुळे ही कोंडी कमी झाली आहे. याची एक जमेची बाजू म्हणजे हे काम अतिशय वेगाने पूर्ण केले जात आहे. 
आता लवकरच सायबर चौकाकडे ही गॅसपाईप लाईन येईल. साधारण मार्चअखेर शहरातील काही प्रभांगात ही गॅस पाईपलाईन पोचणार आहे. वर्षाअखेर प्रत्यक्षात स्वयंपाक घरात गॅस पोचणार असल्याचे कंपनीचे अधिकारी रोहित पोवार यांनी सांगितले. 

हा गॅस "सीएनजी' असेल 
*"सीएनजी' गॅसमुळे स्वयंपाक घर वगळता आग लागणार नाही 
*हिंदुस्थान पेट्रोलियमकडून (एच.पी.) काम सुरू आहे. 
*कनेक्‍शन घेण्यासाठी डिपॉझिट द्यावी लागणार 
*स्वयंपाक घरापर्यंतचा खर्च कंपनीचा असणार 
*टेंबलाईवाडी येथे कंपनीचे कार्यालय 
*डिपॉझिटचा किती निश्‍चित नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : आजीबाईने डिलीट केले १२ व्होट..! अर्ज कोणी केला, काय म्हणाल्या गोडाबाई? राहुल गांधींनी समोर आणला 'घोळ'

Latest Maharashtra News Updates : निवडणूक आयुक्तांना १८ वेळा पत्र पाठवले, तरीही काहीही उत्तर मिळाले नाही

Asia Cup 2024 Super 4 Scenario : भारत, पाकिस्तान यांची जागा पक्की; अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश यांना काय करावं लागणार?

ज्ञानेश कुमार मतचोरांचं संरक्षण करतायत, मी पुराव्याशिवाय बोलत नाहीय : राहुल गांधी

iPhone Air! अ‍ॅपलचा कागदासारखा पातळ स्मार्टफोन; कुणी खरेदी करावा अन् कुणी अजिबात घेऊ नये? एकदा बघाच

SCROLL FOR NEXT