kolhapur  Esakal
कोल्हापूर

Kolhapur : तुमचं गाव इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये आहे! गावकरीच आहेत अनभिज्ञ

कोल्हापूर जिल्ह्यातील १८४ गावांचा समावेश

संदीप खांडेकर

कोल्हापूर - इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये (संवेदनशील क्षेत्र) कोल्हापूर जिल्ह्यातील १८४ गावांचा समावेश असून, सर्वाधिक ५१ गावे शाहूवाडी तालुक्यातील आहेत. जे गाव इको सेन्सिटिव्हमध्ये ते गावकऱ्यांनाच माहीत नसल्याची स्थिती आहे. ‘अहो तुमचं गाव इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये आहे!,’ असे आम्ही सांगितल्यावर गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्‍नचिन्ह उभे राहिले. पश्‍चिम घाटाच्या दौऱ्यात संवेदनशील क्षेत्राबाबत जनजागृती करण्यात शासन कमी पडल्याचे चित्र दिसले.

आजरामार्गे आंबोली, दोडा ते तिलारी घाटात गेल्यानंतर ठिकठिकाणी गावकऱ्यांशी संवाद साधला. त्यांचे राहणीमान, आर्थिक स्त्रोत, परंपरा यांची माहिती घेत वन्यजीव, औषधी वनस्पतींबाबत विचारणा करत होतो.त्यातून संवेदनशील क्षेत्रात तुमच्या गावाचा समावेश आहे, हे तुम्हाला माहीत आहे का, यावर नकारघंटा आल्यानंतर त्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचली नसल्याचे चित्र स्पष्ट होते.

स्थानिकांना केवळ गावाचा विकास हवा, पण तो होताना त्याचा जैवविविधतेवर काय परिणाम होणार, याची कल्पना मात्र त्यांना नव्हती. पर्यावरणतज्ज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील संवेदनशील क्षेत्रातील १८४ गावांचा तपशील दिला. गावातील ग्रामपंचायतींना जैवविविधता नोंद वही दिली, त्यात त्या त्या ग्रामपंचायतींनी जैवविविधतेची नोंद करायची आहे. बहुतांश गावांनी त्याचे पालन केलेलेच नाही.अशी आहेत संवेदनशील गावे

आजरा (२० गावे)

हाजगोळी खुर्द, विनायकवाडी, मेळेवाडी, वेळवट्टी, पारपोळी, दारडेवाडी, हळोळी, गवसे, सुळेरान, किटवडे, आम्बाडे, अवंडी, डचंगी, केराकबोल, पोलगाव, सातेवाडी, चाफवडे, लाटगाव, एरंडोल, चितळे.

गगनबावडा (२४)

निवडे, वेसर्डे, तळीये खुर्द, तळीये बुद्रुक, कोदे खुर्द, कोदे बुद्रुक, मणदूर, मांडुकली, अणदूर, खोकुर्ले, असळज, धुंडवडे, वेसरफ, पळसंबे, सैतवडे, सांगशी, शेळोशी, जारगी, काटाळी, काडवे, बोरबेट, गारीवडे, नारवळी, बावेली.

भुदरगड (२८)

हणबरवाडी, गिरगाव, फये, फणसवाडी, देवाकेवाडी, खेडगे, मुरकाटे, बिद्री, वासणोली, पाडकुंभे, शिवदेव, बेडीव, सोनुर्ले, आंतुर्ली, कुडटारवाडी, नावळे, मेघोली, महासरंग, वेसर्डे, देवर्डे, पालियाचुडा, मठगाव, कारिवडे, चिक्केवाडी, अंतिवडे, मानी, चिवळे, ढेले.

चंदगड (२१)

धामापूर, पुंद्रा, कन्नूर-खुर्द, साडे गुडवाळे, भागोली, पिळणी, कोकरे, नागवे, उमगाव, जांभरे, गुळावळे खालसा, इसापूर, जेलुगडे, वाघोत्रे, किटवडे, मिरवेल, काळसवाडे, हानगोळी, कोदाळी, खालसा माळुंगे, कोलिक.

शाहूवाडी (५१)

सोनार्ली, चांडेल, दुर्गावाडी, वाडी हुदुंब, कारडे, ढाकळे, आंबोली, तानाली, तांबवे, निवळे, उरवाल, उदगिरी, शिराळे तर्फे वारूण, कांडवण, मालगाव, गोळीवणे, जांभूर, पळसावडे, विराळे, पारळी निनाई, पुसारळे, वाकोली, आंबा, तालावडे, चालनवाडी, मासनोळी, हुंबावळी, घोलसावडे, जावळी, कासार्डे, वाडी कळकवणे, धनगरवाडी, गजापूर, येळवण जुगाई, ऐनावडी, म्हालसवडे, गेळावडे, पुंदुरे, शिराळे तर्फ मलकापूर, गिरगाव, पारिवणे, मांजरे, बुरांबळ, सोनुर्ले, येळवडी, मोसूम, कांटी, अनुस्कुरा, बर्की, सावर्डी, इनजोळी.

पन्हाळा (१४)

पाटपन्हाळा, वाशी, कौरवाडी, मानवाड, किसरूळ, मुगाडेवाडी, पोहाळवाडी, काळजवडे, पडसाळी, कोळीक, पोमबरे, गोठणे, हारपावडे, पानोरे.

राधानगरी (२६)

कोनोळी तर्फे आसंडोली, कांदलगाव, राई, मानबेट, पडसाळी, पिरळ, फेजिवडे, करंजफेण, ओळवण, शिरोली, सावरधन, राधानगरी, बनाची वाडी, न्यू करंजे, रामनवाडी, फराळे, पाटपन्हाळा, आयनी, राजापूर, चाफोडी तर्फ आईनघोळ, सावर्डे, गावठाणवाडी, वडाचीवाडी, आडेळी, डुबाळेवाडी, दाजीपूर कारिवडे.

‘इको सेन्सिटिव्ह’ला फाटा, गावाला घाटा

चंदगड तालुक्यातील माडवळे, जंगमहट्टी, कलिवडे यांचा इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये समावेश केला पाहिजे, असे पर्यावरण तज्ज्ञांचे म्हणणे आहे. येळवण जुगाई, मानोली, शाहूवाडी तर्फ मलकापूरचा प्रस्तावित खाणकामांच्या यादीत समावेश केला जाणार असल्याने, त्यावरही त्यांचा आक्षेप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Shubman Gill : शुभमन गिलची स्पर्धेतून माघार; ब्लड टेस्टनंतर फिजियोने BCCI ला पाठवला अहवाल अन्...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : खड्ड्यांनी ठप्प वाहतूक! करंजाळी घाटात बससह चार वाहने अडकली

SCROLL FOR NEXT