कोल्हापूर : गुळाच्या बॉक्सचे वजन सौद्यात धरण्याचा तोडगा sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : गुळाच्या बॉक्सचे वजन सौद्यात धरण्याचा तोडगा

तिसऱ्या दिवशी सौदे बंद; शेतकरी-व्यापारी वादावादी; उद्यापासून सौदे पूर्ववत

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : गुळाच्या बॉक्सचे वजन धरले जात नसल्याच्या कारणावरून सुरू झालेल्या गूळ उत्पादक व व्यापाऱ्यांच्या वादात आज सलग तिसऱ्या दिवशी सौदे बंद राहिले.

व्यापाऱ्यांनी खरेदीच थांबवल्याने पेच निर्माण झाला. गूळ उत्पादकांनी जोरदार वाद केला. अखेर शेतकऱ्यांनी रव्यांच्या बॉक्ससह जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली, पुन्हा शेतकरी बाजार समितीत आले. बैठक झाली. यावेळी दुपारपर्यंत खडाजंगी चर्चा झाली. यात बॉक्सचे वजन सौद्यात धरण्याचा तोडगा निघाला. त्यानुसार सोमवारपासून सौदे सुरू करण्याचा निर्णय झाला.

शाहू मार्केट यार्डात शेतकरी गूळ घेऊन येतात, तो सौद्याला लावल्यानंतर गुळाच्या बॉक्सचे वजन केले जाते. यातील फक्त गुळाचे वजन धरून गुळाचे पैसे दिले जातात; मात्र बॉक्सचे वजन धरले जात नसल्याने पैसे मिळत नाहीत. यात शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे बॉक्सचे वजन गृहीत धरून त्याचेही पैसे द्यावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे; मात्र त्याला व्यापाऱ्यांनी विरोध केला. यावरून दोन दिवस व्यापारी व गूळ उत्पादक शेतकरी यांच्यात वाद सुरू आहे. या बाजार समितीने काल गुळाच्या बॉक्सचे वजन धरले जावे, अशा सूचना व्यापाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार आज सौदे होणार होते. सकाळी अनेक शेतकरी रवे घेऊन बाजारपेठेत आले; मात्र व्यापारी सौद्यासाठी आले नाहीत. गुळाची खरेदी होऊ शकली नाही. माल पडून राहतोय हे दिसताच शेतकरी संतप्त झाले. त्यांनी गुळाच्या गाड्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याची माहिती जिल्हा सहकार निबंधकांना दिली. सहकार निबंधक अमर शिंदे यांच्या उपस्थितीत बाजार समितीत शेतकरी, व्यापारी प्रतिनिधींची बैठक झाली. तिथे बॉक्सचे वजन सौद्यात धरावे, त्याचे पैसे द्यावे असे ठरले. मंडळ सदस्य प्रा. जालंदर पाटील, नामदेव पाटील, मानसिंग पाटील व सचिव जयवंत पाटील, व्यापारी प्रतिनिधी नीलेश पटेल, विष्णू पाटील, सुरेश पाटील आदी उपस्थित होते.

व्यापाऱ्यांनी घेतली स्वतंत्र बैठक

यंदाच्या गूळ हंगामात गुळाला सरासरी ३६०० ते ३७०० क्विंटल भाव आहे. बहुतांश गूळ गुजरातला जातो; मात्र तेथेही स्पर्धा असल्याने गुळाची मागणी कमी झाली. त्यामुळे जास्त दर देण्यासोबत बॉक्सचे पैसे देणेही परवडत नाही; मात्र चांगल्या गुळाला चांगला भाव देण्याचा व्यापारी प्रयत्न करतील, असे मुद्दे व्यापाऱ्यांनी स्वतंत्ररीत्या घेतलेल्या बैठकीत चर्चिले गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahmedabad Plane Crash : वैमानिकाच्या चुकीमुळे नाही तर 'या' मुळे घडली अहमदाबाद विमान दुर्घटना, अमेरिकेच्या तपास संस्थेचा दावा

'मी कर्जाने घर घेतलं असतं आणि मेले असते तर...' उषा नाडकर्णी घराबद्दल बोलताना म्हणाल्या...

Iran War Ceasefire Talks : मोठी बातमी ! इराण युद्धबंदीच्या चर्चेसाठी तयार पण... डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितला नेमका अडथळा काय?

Crime News : प्रेमाचा भयानक शेवट! पत्नीच्या प्रियकराची पतीने केली हत्या; पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Viral Video: आधी आई-वडील गेले, मग पतीही गेला… माझ्या मुलाची काळजी घ्या... ; आईने व्हिडिओत रडत सांगितलं अन् संपवलं जीवन

SCROLL FOR NEXT