Kolhapurkar, pay the house tax otherwise face the notice 
कोल्हापूर

कोल्हापूरकरांनो, घरफाळा भरा अन्यथा नोटीस, फौजदारीला सामोरे जा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : घरफाळ्याच्या प्रत्येक प्रकरणाची छाननी करा. वेळेत घरफाळा न भरणाऱ्यांना नोटीस पाठवा. त्यानंतर घरफाळा बुडवणाऱ्यांवर थेट फौजदारी कारवाई करा, असा निर्वाणीचा इशारा शुक्रवारी महापालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेमध्ये सदस्यांनी प्रशासनाला दिला. कोरोनामुळे आगामी वर्षभर तारेवरची कसरत करावी लागणार आहे. घरफाळ्याबरोबरच महापालिकेच्या मिळकतींमधील भाडे वसुलीही सक्तीने करावी, अशी सूचनाही करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर निलोफर आजरेकर होत्या. 

सभेच्या कामकाजास दुपारी पाऊणच्या सुमारास सुरवात झाली. स्थायी सभापती संदीप कवाळे यांनी अंदाजपत्रक सादर केले. त्यानंतर सदस्यांनी मते मांडली. 
सुरुवातीला प्रा. जयंत पाटील म्हणाले, ""कोरोनाचे संकट दूर झालेले नाही. अंदाजपत्रकात जमेत घट दिसते. आर्थिक तुटीमुळे आयुक्तांनी पूर्वीच कामे थांबविली आहेत. कोरोनाची स्थिती पाहता राज्य शासनाकडून पैसे येतील, अशी स्थिती नाही. त्यामुळे प्रशासनाने आपल्या साधनसामुग्री विचार करायला हवा. मालमत्ता विभागाकडे कोणतेही धोरण नाही. ज्या प्रकरणात तडजोड करावी लागते, ती करा; पण महापालिकेचे अडकलेले पैसे एकदा बाहेर काढा. घरफाळा विभागाला भ्रष्टाचाराची लागण झाली आहे. प्रशासनाकडे प्राप्त 14 प्रकरणांचा विचार झाला आहे. अजूनही तक्रारी येणे बाकी आहे. यातील प्रत्येक प्रकरणाची छाननी करा. जे लोक स्वतःहून फाळा भरायला तयार आहेत, त्यांना प्रसंगी माफी द्या. सरळमार्गाने फाळा भरण्याचे आवाहन करा. नंतरही जमा होत नसेल तर फौजदारी करावी. महापालिकेची आगामी निवडणूकही पुढे जाणार, हे निश्‍चित आहे. मुदत संपल्यानंतर प्रशासकाची नियुक्ती होईल. त्यामुळे उत्पन्न वाढीसाठी प्रशासनाने पावले उचलावीत.'' 

गटनेता शारंगधर देशमुख म्हणाले, ""ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, त्यांनी घरफाळा माफीचा लाभ घेऊ नये. जे खरेच गरीब आहेत, त्यांनाच घरफाळा माफीचा लाभ व्हावा.'' आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनीही अशीच भूमिका घेतली. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांना लाभ न घेण्याविषयी हात जोडून विनंती करू, असे सांगितले. 

 हे पण वाचा - यामुळेच म्हणतात जगात भारी कोल्हापुरी ; त्या नोटिसीने घातलाय सोशल मीडियावर धुमाकूळ


सत्यजित कदम म्हणाले, ""ऑनलाईन यंत्रणा इतकी भारी आहे की मूळ फाईल कुठे जाते, हेच समजतच नाही. या प्रक्रियेत सुधारणा होणे आवश्‍यक आहे. तातडीने विशेष कॅम्प लावून प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा. महापुराच्या काळात बापट कॅंम्प, कदमवाडी ते ई वॉर्डात रस्ते वाहून गेले. त्यांची अवस्था आजही दयनीय आहे. घरफाळ्यात त्यांना सवलत माफ करण्याचा निर्णय झाला. मात्र प्रत्यक्षात यात अनेक जणांच्या नावाचा समावेश नाही. तहसीलदारांकडे यादी तयार आहे. आता तरी त्या यादीद्वारे पूरग्रस्तांचा विचार व्हावा.'' 

बुडव्यांना बडगा दाखवाच... 
सभेमध्ये भुपाल शेटे म्हणाले, ""घरफाळ्याचे काम करण्याअगोदरच संबंधित ठेकेदाराला रेड कार्पेट अंथरले गेले. त्या सर्व्हेचा काहीही फायदा झाला नाही. टॉवर कंपन्यांची केबल, विविध बॅंकांची ए.टी.एम यांच्या मार्फत महापालिकेचे उत्पन्न बुडत असल्याकडे आपण लक्ष वेधले; मात्र त्याचा उपयोग झाला नाही. महापालिकेच्या विविध मार्केटमध्ये 40 कोटींची थकबाकी आहे. ती वसूल करावी. कर, घरफाळा बुडव्यांना बडगा दाखवाच.'' 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पुल परिसरात अपघाताची मालिका सुरूच; तीव्र उतारावरून येणाऱ्या ४ ते ५ गाड्यांची धडक

Mokhada Accident:'पालघर- संभाजीनगर बसला अपघात'; 25 हुन अधिक प्रवासी जखमी, तिघे गंभीर..

Latest Marathi Breaking News: घाटकोपरच्या केव्हीके शाळेत पुन्हा विषबाधेचा प्रकार

Winter Care Tips : थंडीत तुमचा कूलर बनेल Room Heater! फक्त 130 रुपयांत 'हा' करा सोपा जुगाड

Viral Video: 'झटपट पटापट, रांगोळी काढा पटापट...' डॅनी पंडितच्या गाण्याने लोकांना लावलं वेड, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT