Kolhapur's final supply line will be finalized by the end of May 
कोल्हापूर

कोल्हापूरची उर्वरित पूररेषा मेअखेर निश्‍चित होणार

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर ः पंचगंगा नदीच्या पात्राजवळील शहरातील रेड आणि ब्ल्यू पूररेषा निश्‍चित झाली, मात्र उर्वरित पूररेषा केव्हा होणार याकडे अनेक बांधकाम व्यवसायिकांचे लक्ष लागून राहिले होते. आता ही उर्वरित 15 किलोमीटरची पूररेषा पावसाळ्यापूर्वी निश्‍चित होणार आहे. त्याचे सर्वेक्षण आता सुरू झाले असून, मेपूर्वी त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्‍यता आहे. यामध्ये कदमवाडी, जाधववाडी, गांधीनगर, वळिवडेतील रेषेवर शिक्कामोर्तब होऊ शकते. 
नुकताच बांधकाम क्षेत्रासाठी युनिफाईड बायलॉज राज्यशासनाने लागू केला आहे. त्यामुळे आता बांधकाम प्रकल्प वाढण्याची शक्‍यता आहे. यामध्ये तातडीने उर्वरित पूररेषा निश्‍चित न झाल्यास पुन्हा पूररेषेतील बांधकामांचा प्रश्‍न ऐरणीवर येण्याची शक्‍यता नाकारता येत नव्हती, मात्र ही रेषा निश्‍चित करण्याचे काम आता सुरू झाले आहे. 2005, 2019 या दोन्ही वेळी आलेल्या महापुरानंतर पूररेषा हा विषय गाजला होता, मात्र त्यावर तातडीने रेषा निश्‍चित करणे शक्‍य झाले नाही. 
2019 मध्ये याबाबत झालेल्या वादळी चर्चेनंतर हा विषय निकाली काढण्यात आला, मात्र पहिल्या टप्प्यात 14.600 किलोमीटरची पूररेषा निश्‍चित झाली होती. उर्वरित रेषेचा सर्व्हे करण्यासाठी निधी नसल्यामुळे हे काम प्रलंबित होते. आता दुसऱ्या टप्प्यातील पूररेषा निश्‍चित करण्यासाठी यावर्षी 40 लाखांचा निधी जलसंपदा विभागाला मिळाला आहे. त्यामुळे प्राथमिक टप्प्यातील सर्वेक्षण सुरू झाले आहे. साधारण पंधरा जानेवारीपर्यंत सर्व्हेतील पहिला टप्पा पूर्ण होईल. त्यानंतर तपासण्या, भेटी, आयआयटी पवईच्या माध्यमातून त्रयस्थ तपासणी होणार आहे. त्यानंतर साधारण मेमध्ये या रेषेवर शिक्कामोर्तब होईल. 

दुसरा टप्पा 
पंचगंगा नदीजवळील पहिल्या टप्प्यात सुमारे 14.600 किलोमीटरची पूररेषा निश्‍चित झाली आहे. त्यानंतर आता पंधरा किलोमीटरची रेषा दुसऱ्या टप्प्यात निश्‍चित होणार आहे. यामध्ये कदमवाडी, जाधववाडी, गांधीनगर, वळिवडे, फुलेवाडी, लक्षतीर्थ वसाहत येथील पूररेषा निश्‍चित होणार आहे. 

दृष्टिक्षेपात 
पंचगंगा नदी किनाऱ्यावरील तीस किलोमीटरचे सर्वेक्षण होणार 
प्रयाग चिखली ते रुकडीपर्यंतचा सर्व्हे दुसऱ्या टप्प्यात होणार. 
शिरोळपर्यंतची संपूर्ण पूररेषा तिसऱ्या टप्प्यात होणार 
प्राधिकरणाची हद्द म्हणून दुसऱ्या टप्प्यात महापालिका परिसरातील गावांचा समावेश 
कोरोनामुळे केवळ रुकडीपर्यंतच्या सर्वेक्षणाला मंजुरी 
प्रयाग चिखली ते शिरोळ 50 किलोमीटरची एकूण पूररेषा निश्‍चित होणार.

संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest Shivaji Park : अभिजित दिपके मुंबई पोलिसांच्या रडारवर? शिवाजी पार्कवरील आंदोलन बेकायदेशीर?; CJPच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

Latest Marathi News Live Update : दिवसभरात काय घडलं? देशविदेशातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

MPSC Student Agitation Issue : एमपीएससी आंदोलनातील फूट; शिष्टमंडळाच्या परस्पर निर्णयाने विद्यार्थ्यांमध्ये संताप

Gangapur News : गंगापूर तालुक्यात खरीप हंगामच्या पंचनाम्याला वेग; दोन दिवसात १६ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्राचा पंचनामा पूर्ण

Satara District Bank Election : भाजप, राष्ट्रवादीने वाढवले उंडाळकरांचे टेन्शन! बाळासाहेब पाटलांसह भाजपचे तीन दिग्गज मैदानात; उमेदवारीचा दावेदार कोण याचीच उत्सुकता

SCROLL FOR NEXT