Kolhapur's name is big 
कोल्हापूर

पैलवानांनी अंग झिजवून केले कोल्हापूरचे नाव मोठे 

संदीप खांडेकर

शाहूपुरी तालीम पैलवानांच्या कर्तुत्वाने गाजलेली आहे. कुस्ती क्षेत्रात तालमीचे नाव आहे. अनेक नामांकित पैलवानांनी तालमीत अंग झिजवून कोल्हापूरचे नाव मोठे केले आहे. गणेशोत्सव साजरा करण्यात पैलवान मंडळी पुढे असतात. शिवाय, एखाद्या पैलवानाला हातभार देण्यातही ते कमी पडत नाहीत. 

शाहूपुरी तालमीची स्थापना कधी झाली, याची माहिती उपलब्ध नाही. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा अभिमान बाळगून पैलवान कुस्ती क्षेत्रात आपले नाव चमकत आहेत. कुस्तीचे धडे घेण्यासाठी आजही ग्रामीण भागातील पैलवान या तालमीला पसंती देतात. या तालमीतून श्रीपती खंचनाळे हिंदकेसरी, दिनकर दह्यारी, गोरख सरक, मुन्नालाल शेख, आप्पालाल शेख, इस्माईल शेख, हजरत पटेल, संजय पाटील-आटकेकर महाराष्ट्र केसरी, मौलासाब शेख मारुती वडर रवींद्र पाटील उपमहाराष्ट्र केसरी झाले आहेत. 

सुरुवातीला ही तालीम मातीच्या खाण्याची होती. त्याला आता मॅटची जोड मिळाली आहे. पहाटे साडेचार ते साडे सात व दुपारी तीन ते सातपर्यंत 
तालमीत मलांचा सराव घेतला जातो. प्रशिक्षक म्हणून रवींद्र पाटील व आकाश नलावडे मुलांच्या सरावात कोणतीही कसूर करत नाहीत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पैलवान ज्या पद्धतीने मेहनत घेतात, तशी मेहनत तालमीतल्या पैलवानांनी घ्यावी, यासाठी येथे अत्याधुनिक मशिनरींची व्यवस्था केली आहे. मल्लांना खुराक कसा घ्यावा, व्यायाम कसा करावा, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीत बदललेले टेक्‍निक काय आहे, याची माहिती येथे दिली जाते. 

उपमहाराष्ट्रकेसरी संतोष दोरवड याच तालमीचा मल्ल आहे. आजही तालमीत अनेक मल्ल घडत आहेत. विशेषतः छोट्या मल्लांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. केवळ कुस्ती खेळ शाहूपुरी तालमीचा अविभाज्य घटक असला तरी गणेशोत्सव साजरा करण्यात पैलवान मागे नाहीत. दरवर्षी गणेशमूर्ती शाहूपुरी कुंभार गल्लीतून वाजत-गाजत आणून तिची तालमीत प्रतिष्ठापना केली जाते. एखाद्या पैलवानाची आर्थिक स्थिती बेताची असेल तर अन्य पैलवान त्याला सहकार्य करण्यासाठी मागे राहत नाहीत. एखाद्या पैलवानाला दुखापत झाली असेल तर त्याच्या खर्चाची जबाबदारीही उचलतात. 

सोशल मीडियावर प्रशिक्षण...
संचारबंदीत पैलवानाचा सराव थांबला असला तरी त्यांना सोशल मीडियावर प्रशिक्षण दिले जात आहे. त्यांच्या अडचणी सोडविल्या जात आहेत. 

आमची तालीम गाजलेली तालीम असून, आम्ही सामाजिक उपक्रमही घेतो. तालमीचा लौकिक वाढवणे आम्हाला महत्त्वाचे आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराने चालणारी ही तालीम आहे. 
- रवींद्र पाटील, प्रशिक्षक 


संपादन : प्रफुल्ल सुतार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025 Ind vs Pak : मैदानात उगाच उन्माद! हॅरिस रौफचा माज ICC ने उतरवला... सर्वात मोठी शिक्षा!

Sikandar Shaikh Gets Bail : पैलवान सिकंदर शेखला जामीन, शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणात दिलासा; सिकंदरचे वर्तन वाचवलं...

Pune ATS : जुबेरच्या अटकेनंतर साथीदारांनी संशयित पुस्तके व कागदपत्रे जाळली; पोलिस तपासातील माहिती

Pune Crime : बाजीराव रस्त्यावर भरदिवसा थरार; तरुणाचा कुकरीने वार करून खून

'ठरलं तर मग' मध्ये अखेर अस्मिताच्या नवऱ्याची एंट्री; 'हा' अभिनेता साकारतोय सुभेदारांच्या जावयाची भूमिका, चेहरा समोर

SCROLL FOR NEXT