कोल्हापूर : बांधकाम व्यवसायातील निम्मे कामगार लॉकडाउनमुळे कमी झाले आहेत. गंवडी कामातील 30 टक्के कामगार कमी झाले आहेत. इतर इलेक्ट्रीकल, फरशी फिटिंग, प्लंबिंग, पेंटींगमध्ये 50 टक्के कामगार नाहीत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील 4 हजार 745 बांधकाम कामगारांत केवळ 512 हे कामगार मंडळाकडे नोंदणीकृत आहेत. यामुळे बांधकाम संपविण्यावर मर्यादा आल्या आहेत.
कोरोनाने अनेक व्यवसायांत बदल घडवून आणले. परप्रांतिय कामगार मूळ गावी परतले आणि बांधकाम व्यावसायिकांना खऱ्या कामगारांची गजर अधोरेखित झाली. कष्टाचे आणि कमी वेळेत जादा काम करणारेच कामगार गेल्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना त्याचा फटका बसला. परप्रांतियांच्या व्यतिरिक्त जिल्ह्यात किती बांधकाम कामगार आहेत याची माहिती घेण्याचे काम सुरू झाले. त्यांना कौशल्य विकासाचे धडे देणे, त्यांना बांधकामावर प्रशिक्षण देण्याचा निर्णय क्रेडाईने घेतला. त्यासाठी त्यांनी सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडे चौकशी केली तेंव्हा रेकॉर्डवर केवळ 512 कामगार असल्याचे दिसून आले.
त्यानंतर क्रेडाईने कामगारांची माहिती घेण्याचे काम सुरू केले. त्यांनी कामगारांना विविध लाभ मिळवून देण्यासाठी त्यांची नोंदणी सहायक कामगार आयुक्तांकडे करून देण्यासाठी पाऊले उचलली. झालेल्या पाहणीत कामगारांची मूळसंख्या लॉकडाउननंतरची स्थिती आणि प्रत्यक्षात नोंदणीकृत कामगारांची माहिती पुढे आली. सध्या कोरोना महामारी सुरू असल्यामुळे कौशल्य विकासाचे धडेही देणे अशक्य झाले आहे.
बांधकाम कामगारांची नोंदणी कामगार विभागाकडे झाल्यास त्यांना फायदे मिळणार आहेत. नोंदणी करून देण्यासाठी क्रेडाईने पुढाकार घेऊन पाहणी केली आहे. लॉकडाउन पूर्वीची नंतरची स्थिती पुढे आली आहे. कामगारांना कौशल्य विकासाचे धडे दिल्यास अधिक दर्जेदार काम करू शकणार आहेत. यासाठी क्रेडाई प्रयत्नशील आहे.
- विद्यानंद बेडेकर , अध्यक्ष क्रेडाई कोल्हापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.