Madrasa Building Controversy in Lakshatirth Colony esakal
कोल्हापूर

'लक्षतीर्थ'मधील मदरशाचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त; शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या 600 जणांवर गुन्हा दाखल

लक्षतीर्थ वसाहतीतील (Lakshtirth Colony Madrasa) मदरशाचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

आजरेकर यांनी जमावाला चिथावणी देऊन महापालिकेला घेराओ घालण्यास भाग पाडले. काहींनी पोलिस आणि शासकीय अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली.

कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहतीतील (Lakshtirth Colony Madrasa) मदरशाचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करताना शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल एक व महापालिकेसमोर (Kolhapur Municipality) बेकायदेशीर ठिय्या करून वाहतूक अडविल्याबद्दल दुसरा असे दोन गुन्हे लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात (LakshmiPuri Police Station) दाखल झाले.

यामध्ये मुस्लिम समाजाचे (Muslim Community) नेते गणी आजरेकर यांच्यासह सुमारे सहाशेहून अधिक जणांवर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली. दरम्यान, गणी आजरेकर, अश्‍किन आजरेकर, यासीन बागवान, मोहसीन दिलावर, फरिदा पाटणकर, कौसर मुजावर, मनोज बागवान, शकील मुल्लाणी, तौसिफ खान, सलीम पन्हाळकर, इरफान बागवान यांच्यासह सुमारे ६०० जणांवर गुन्हा दाखल झाला.

यातील १२० जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. तसेच सोशल मीडियावर वादग्रस्त स्टेटस्‌ ठेवून दहशत निर्माण करण्याचा आणि धार्मिक तेढ वाढवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल यासीन बागवान याच्यावरही गुन्हा दाखल असल्याचे निरीक्षक पवार यांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, ३१ जानेवारीला लक्षतीर्थ वसाहतीतील मदरशाचे अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी गेले होते. यावेळी पोलिस बंदोबस्तसुद्धा होता. तेथे तणाव निर्माण करून शासकीय अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली.

जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. पोलिसांच्या, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे शासकीय कामात अडथळा केल्याच्या कलमासह इतर कलमांनुसार गुन्हा दाखल झाला आहे. तसेच ही कारवाई सुरू असताना ती रोखण्यासाठी महापालिकेसमोर बेकायदेशीर ठिय्या आंदोलन करून वाहतुकीला अडथळा निर्माण केला म्हणून दोन्ही ठिकाणी स्वतः पोलिस फिर्यादी होऊन दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.

सकाळी लक्षतीर्थ वसाहत शासकीय अधिकारी कारवाईसाठी गेल्यानंतर गणी आजरेकर यांच्यासह परिसरातील महिला आणि मुस्लिम तरुणांनी कारवाईला विरोध करून मदरशासमोर ठिय्या मारला. यावेळी आजरेकर यांनी जमावाला चिथावणी देऊन महापालिकेला घेराओ घालण्यास भाग पाडले. काहींनी पोलिस आणि शासकीय अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आज दोन वेगवेगवेळे गुन्हे दाखल केले आहेत. संबंधितांना अटक करण्याची प्रक्रिया पुढे सुरू राहणार असल्याचेही गुन्हा दाखल केल्याची माहिती निरीक्षक पवार

यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT