Lata Mangeshkar esakal
कोल्हापूर

अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर लतादीदी काेल्हापुरात 'या' ठिकाणांना भेट देत

कोल्हापुरात लतादीदी साडी, दागिने, खाण्याचे पदार्थ याच ठिकाणाहून खरेदी करत

विजय पाटील : सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे कोल्हापूरशी एक भावनिक नाते होते. लतादीदींची (Lata Mangeshkar) कर्मभूमी जरी मुंबई असली तरी जयप्रभा स्टुडिओ व पन्हाळ्यातील बंगला यामुळे त्यांचे लहानपण बहुतांशी वास्तव्य कोल्हापुरातच गेले. (Kolhapur) कोल्हापुरात लतादीदी साडी, दागिने, खाण्याचे पदार्थ खरेदीची हौस पूर्ण करणारी काही खास ठिकाणे होती. मुंबई मुक्कामी पेढे खाण्याची किंवा चुरमुरे खाण्याची इच्छा झाली की कोल्हापूरला निरोप पाठवून लतादीदी पार्सल मागवून घ्यायच्या. लतादीदींचे स्नेही श्रीकांत डिग्रजकर यांनी त्यांच्या आठवणींनी उजाळा दिला आहे.

मुंबई मुक्कामी पेढे खाण्याची किंवा चुरमुरे खाण्याची इच्छा झाली की कोल्हापूरला निरोप पाठवून पार्सल लतादीदी मागवून घ्यायच्या.

वर्षातून दोन साड्या याच दुकानातून खरेदी करत

लतादीदींना कोल्हापूरातून साडी खरेदी करणे फार आवडत होते. त्या विशेषत: पांढऱ्याशुभ्र, दुधी, क्रिम अशा रंगांच्या साड्यांना पसंती देत. बहुधा त्यांच्या आवडीचे हे रंग असावेत. कोल्हापुरातील (kolhapur) महादवार रोडवरील पोरे ब्रदर्स यांच्या साडी दुकानात लतादीदींची हमखास साडीची खरेदी ठरलेली असयाची. त्याकाळात वर्षातून दोन साड्या त्या घ्यायच्या. पुढे संगीत क्षेत्रात गायिका म्हणून स्थिरावल्यानंतरही साडी खरेदीसाठी त्या कोल्हापुरातच येत होत्या. पोरे ब्रदर्सनंतर स्टेशनरोडवरील इंगळे साडी हाऊस हेदेखील त्यांच्या साडी खरेदीचे केंद्र बनले. सुती, सिल्क, अंबरपॉलिस्टर यासोबत कॉटन चंदेरी, इंदोरी या प्रकारातील साड्या त्यांना आवडत होत्या.

माईंकडूनच लतादीदींना जेवणाचा डबा

चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी दीदी भोजे यांच्या हुपरी ऑर्नामेंट या पेढीवर जात असत. भोजे म्हणजे भालजी पेंढारकर यांच्या पत्नी बकुळा म्हणजे माई पेंढारकर यांचे भाचे. कोल्हापुरात जयप्रभा मुक्कामात लतादीदींसाठी माईंकडूनच जेवणाचा डबा यायचा. लतादीदींच्या त्या बकुळामावशी. मुंबईतून कोल्हापूरला यायचे ठरले की लतादीदी बकुळामावशींनाच पत्र लिहून कळवायच्या. अशा कित्येक पत्रांचा संग्रह आजही कोल्हापुरातील श्रीकांत डिग्रजकर यांच्याकडे आहे. बकुळामावशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी लतादीदींचा खास स्नेह असल्याने दीदी दागिन्यांसह चांदीच्या समया, आरतीचे तबक, निरंजने अशा पूजासाहित्याची खरेदी भोजे यांच्या हुपरी ऑर्नामेंटमधूनच करत. बांगडय़ा घालण्याचीही दीदींना खूप आवड होती.

महाद्वार रोडवरील बांगड्यांची आवड भारी

अंबाबाई मंदिरातील महाद्वारला लागूनच असलेल्या माहेर ब्ँगल्समधून बांगड्या भरल्याशिवाय दीदी कधीच कोल्हापूर सोडायच्या नाहीत. माहेर ब्ँगल्स या दुकानात साठच्या दशकातील दीदींचे बांगड्या भरतानाचे फोटो आजही त्या क्षणांच्या आठवणीची साक्ष देतात. तिथूनच पुढे महाद्वार चौकातील दुकानांच्या ओळीतलं दुसरंच दुकान म्हणजे दगडू बाळा भोसले यांनी बनवलेल्या पेढ्यांचे. अंबाबाईचे दर्शन झाले की लतादीदींना याच दुकानातील पेढे लागायचे.

पेढे, चुरमुरे याच दुकानातून खरेदी

लहानपणी जेव्हा पोटात भूकेची आग पेटायची आणि खायला काहीच नसायचे तेव्हा मंगळवार पेठेतील कोळेकर तिकटीच्या शिंगोशी मार्केटच्या कोपर्‍यावर असलेल्या गंगाराम यांच्या दुकानातील चुरमुर्‍यांनी मंगेशकर भावंडाची भूक भागवली आहे असेही डिग्रजकरांनी नमूद केले. त्या चुरमुर्‍यांना दीदी कधीच विसरल्या नाहीत. मुंबई मुक्कामी पेढे खाण्याची किंवा चुरमुरे खाण्याची इच्छा झाली की कोल्हापूरला निरोप पाठवून लतादीदी पार्सल मागवून घ्यायच्या. आजही ही ठिकाणे कोल्हापुरात आहेत. त्यांच्या पुढच्या पिढया हे व्यवसाय सांभाळत आहेत. लतादीदी यांची कोल्हापुरातील ही खरेदीची आवडती ठिकाणे असल्याचा संबंधित व्यावसायिकांनीही खूप आनंद व अभिमान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Touch Wood Tradition: 'टच वुड' म्हणताच लाकडाला हात का लावतात? जाणून घ्या यामागचं रंजक कारण

Global Indian CEOs : जगातील २०० दिग्गज कंपन्यांच्या तिजोरीची चावी भारतीयांच्या हाती! 'या' २३६ जणांचे वर्चस्व, महाराष्ट्र देशात अव्वल!

Latest Marathi News Live Update: एसबीआयच्या ग्लोबल आयटी सेंटरवर सायबर हल्ला

भीषण अपघात! बस कंटेनर ट्रकवर आदळली; २३ प्रवाशांचा मृत्यू; बचावकार्य सुरू

Drought Relief: दुष्काळात शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत, भूमिहीन मजुरांचे काय? उच्च न्यायालयाने राज्य सरकारला काय दिले निर्देश?

SCROLL FOR NEXT